Video : पुण्यातील गुंड निलेश घायवळला मारल्याचा दुसरा व्हिडिओ समोर, हलगीवाल्यादेखतच कानाशिलात लगावली
भूममधील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रे निमित्ताने भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला आहे.

धाराशिव : पुण्यातील (pune) कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर भूम तालुक्यातील आंदरूड गावात हल्ला करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा व्हिडिओ (viral video) देखील समोर आला होता. येथील एका कुस्ती स्पर्धेदरम्यान कुस्तीच्या मैदानात निलेश घायवळ स्वागतार्ह फेरी मारत असताना दुसऱ्या एका पैलवानाने चक्क कुस्तीच्या आखाड्यात उतरुन निलेशच्या कानाशिलात लगावली होती. आता, या घटनेचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यामध्ये, उंचापुरा पैलवान समोर येऊन निलेश घायवळच्या कानाखाली फडकवत असल्याचे दिसून येते.
भूममधील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रे निमित्ताने भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला आहे. आंदरुड येथे यात्रेदरम्यान सुरू असलेल्या कुस्तीवेळी हा घडला प्रकार घडला असून स्पर्धा चालू होण्यापूर्वी निलेश घायवळ हा पैलवाना भेटायला गेला असता त्याला एका तरुणाने कानशिलात लगावली. हल्ला करणारा उंचा पुरा तरुन अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा पैलवा असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या तरुणाला निलेश घायवळच्या कार्यकर्त्यांनी मारहाण सुरू केली. मात्र, यादरम्यान हल्ला करणारा तरुण घटनास्थळावरून पसार झाला होता. विशेष म्हणजे येथील कुस्ती स्पर्धेचे आयोजन निलेश घायवळ यानेच केल्याची माहिती आहे.
निलेश घायवळ हा कुस्ती पाहण्यासाठी आला होता. तो कुस्तीच्या फडात जाऊन पैलवानांची भेट घेत होता. त्यावेळी एक पैलवान अचानक निलेश घायवळच्या अंगावर धावून केला. या पैलवानाने निलेश घायवळ याला मारहाण केल्याचे समजते. त्याने निलेश घायवळच्या श्रीमुखात लगावली. मात्र, आजुबाजूचे लोक लगेच निलेश घायवळच्या मदतीला धावून आले. नव्या व्हिडिओत निलेश कुस्तीच्या आखाड्यात चालताना दिसून येत आहे. तसेच, स्पष्ट उजेडात तो दिसून येत असून व्हिडिओतील शेवटच्या 5 मिनिटांत दुसरा पैलवान त्याच्या अंगावर धावून गेल्याचे पाहायला मिळत आहे.
धाराशिव : कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर#pune #bhoom #viralvideo pic.twitter.com/3WXM7unTCe
— ABP माझा (@abpmajhatv) April 13, 2025
पैलवान सागरवर गुन्हा दाखल
दरम्यान, या घटनेनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकर याच्यावर पोलिसांसमोरच हाणामारी करुन गोंधळ घालण्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, सागर मोहळकर याने निलेश घायवळ याला मारहाण का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु, निलेश घायवळ याच्यासारख्या दबदबा असलेल्या सागर मोहोळकरची सध्या धाराशिव आणि पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
कोण आहे निलेश घायवळ
निलेश घायवळ हा पुण्यातील नामचिन गुंड असून त्याच्यावर मोक्का, खुन, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.

























