IPL 2025 GT vs RR: शास्त्रीय (फलंदाज) साईने २०/२० ची मैफिल सजविली

IPL 2025 Gujarat Titans vs Rajasthan Royals: प्रसिद्ध क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी सर एकदा म्हणाले होते की "ज्याची शास्त्रीय गाण्याची बैठक पक्की आहे तो कुठली ही मैफिल गाजवू शकतो...क्रिकेट मधे पण तसेच आहे ज्याचे तंत्र उत्तम आहे तो २०/२० क्रिकेट गाजवू शकतो"
आज गुजरात संघाच्या साई सुदर्शन ने हेच सिद्ध करून दाखविले..खरे तर हा फलंदाज वारंवार हेच सिद्ध करीत आला आहे..मग ते देशांतर्गत क्रिकेट असू दे किंवा आय पी एल. आज राजस्थान संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून गुजरात संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले..गुजरात संघाची सुरुवात गिल गेल्यामुळे थोडी अडखळत झाली..आर्चर ने पुन्हा एकदा अहमदाबाद मध्ये वेगवान गोलंदाजी करून साई आणि गिल ची परीक्षा घेतली..एका आता येणाऱ्या वेगवान चेंडूवर ( १४७/किमी) गिल चा त्रीफळा उध्वस्त झाला...भारत रत्न सचिन तेंडुलकर वीरेंद्र सेहवाग ला म्हणाले होते..की "गोलंदाज किती ही आखूड टप्प्याच्या गोलंदाजी किंवा बॅक ऑफ लेंथ गोलंदाजी करू दे तो विकेट साठी तुम्हाला वर च गोलंदाजी करेल" याचाच प्रत्यय आज पहिल्या दोन षटकात आला...सुरुवातीला आर्चर ने बऱ्यापैकी आखूड गोलंदाजी केली पण गिल च्या विकेटसाठी त्यांनी शार्प इन स्विंग टाकला..
गिल बाद झाल्यावर साई ने किती सुंदर फलंदाजी केली...फजल फारुकी च्या गोलंदाजीवर तो खूप पुढे आला , फारुकीने हे पाहिले त्याने लेन्थ थोडी शॉर्ट केली....पण त्या परिस्थितीत सुद्धा स्वतःला उत्तम अड्जस्ट करून त्याने एक रॅम शॉट मारला आणि षटकार वसूल केला..एकदा विश्व इले वन संघाकडून खेळत असताना ऑस्ट्रेलियाच्या एका गोलंदाजीवर गॅरी सोबर्स खूप पुढे आले आणि असेच चकले होते गोलंदाजाला वाटले की गॅरी सोबर्स आता बाद होणार पण त्याच चपळाईने गॅरी सोबर्स बॅक फुटवर गेले आणि त्याने सरळ गोलंदाजाच्या वरून एक षटकार वसूल केला.( सनी डेज )आज त्याच गोष्टीची आठवण साई सुदर्शन ने करून दिली.पुढच्याच षटकात त्याने देशपांडे ला उजव्या यष्टी बाहेर जाऊन स्कुप केलं..आणि षटकार वसूल केला..त्याने आपल्या ८२ धावांच्या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकार मारले... हे करीत असताना तो कधी ही आडवे तिडवे खेळत आहे असे वाटले नाही..आणि हेच साई सुदर्शन चे वैशिष्ट आहे....त्याने सुरुवातीला बटलर सोबत ८० धावांची आणि शहारुख सोबत ६२ धावांची भागीदारी करून गुजरात संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला..यामध्ये राहुल तेवटीया आणि शाहरुख खान यांच्या छोट्या पण वेगवान खेळ्यांचा समावेश आहे..
जिंकण्यासाठी २१८ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या राजस्थान संघाची सुरुवात खराब झाली...उजव्या यष्टी च्या बऱ्याच बाहेर जाणाऱ्या चेंडूवर हवेतील स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यशस्वीचा फसला आणि तो डीप पॉईंट वर झेलबाद झाला...तर सिराज च्या एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर अप्पर कट करण्याच्या प्रयत्नात नितीश राणा झेलबाद झाला...त्यानंतर संजू सॅमसन आणि पराग यांनी २६ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली..त्यात पराग याने मारलेल्या २६ धावा होत्या...आणि त्यात त्याचे ३ षटकार होते. राजस्थान खेळत असताना १३ वे षटक नाट्यमय घडले...१२ वे षटक चालू असताना आशिष नेहरा यांनी जयंत यादव याला सीमारेषेवर बोलवून घेऊन एक कानमंत्र दिला..आणि तो कानमंत्र घेऊन आशिष नेहराने त्याला प्रसिद्ध कृष्ण कडे पाठविले..पुढील म्हणजे १३ वे षटक प्रसिद्ध कृष्णा घेऊन आला आणि त्याने सुंदर खेळत असलेल्या संजू ला शॉर्ट थर्ड मॅन वर झेलबाद केले...या नंतर च राजस्थानचा डाव जो कोसळला तो शेवट पर्यंत सावरला गेला नाही. .संजू ने आपल्या खेळीत अर्शद च्या गोलंदाजीवर बॅकफूटवर जाऊन एक्स्ट्रा कव्हर वरून जो षटकार खेचला तो अविश्वसनीय होता...राजस्थान कडून हेटमायार ने प्रहार केला पण तो अपुरा पडला..आणि अहमदाबाद मध्ये पुन्हा एकदा गुजरातच भारी ठरले...गुजरात संघाकडून आज पुन्हा एकदा प्रसिद्ध ने सुंदर गोलंदाजी करून २४ धावत ३ बळी घेतले...आणि त्याला सिराज आणि रशीद ने उत्तम साथ दिली..स्पर्धा मध्यावर आली असताना रशीद ला गोलंदाजीत भेटलेला सूर गुजरात संघाच्या दृष्टीने पुढील सामन्यात महत्त्वाचा ठरेल...आज पुन्हा एकदा आशिष चे विद्यार्थी उत्तम गुणांनी पास झाले..
























