एक्स्प्लोर

IPL 2025, MI vs DC : बुमराहची ओव्हर, तीन बॉल तीन रन आऊट अन् दिल्लीचा बालेकिल्ला ढासळला, मुंबईनं विजयरथ रोखला

DC vs MI : मुंबई इंडियन्सनं कर्ण शर्मानं घेतलेल्या तीन विकेट आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत विजयरथ रोखला.

नवी दिल्ली : करुण नायरनं 89  धावांची वादळी खेळी करुन देखील मंबई इंडियन्सच्या सांघिक कामगिरीपुढं दिल्ली कॅपिटल्सचा बालेकिल्ला ढासळला. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 193  धावांवर बाद झाल्यानं मुंबईनं 12  धावांनी विजय मिळवला. दिल्लीचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानं आणि चुकीचे फटके मारल्यानं त्यांना पराभव स्वीकारावा लागला. कर्ण शर्मानं घेतलेल्या 3 विकेट आणि जसप्रीत बुमराहच्या 19 व्या ओव्हरमध्ये तीन बॉलवर तीन फलंदाज रनआऊट झाले आणि दिल्ली कॅपिटल्सनं मॅच गमावली. मुंबईला दिल्लीचा विजयरथ रोखण्यात यश आलं. रोहित शर्मानं बाहेर थांबून लेग स्पिन गोलंदाजी सुरु ठेवण्याचा सल्ला हार्दिकला दिला अन् मुंबईनं विजय मिळवला.

करुण नायरची वादळी खेळी

दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात समाधानकारक झाली नाही. जॅक फ्रेजर-मॅक्गर्ग खातं न उघडता बाद झाला. यानंतर अभिषेक पोरेल आणि करुण नायर या दोघांनी 119 धावांची भागीदारी केली. करुण नायरनं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यानं 40 बॉलमध्ये 89  धावा केल्या. यामध्ये त्यानं 12 चौकार आणि 5 षटकार मारले. अभिषेक पोरेलनं 33 धावा केल्या. पोरेल बाद झाल्यानंतर दिल्लीच्या विकेट नियमित अंतरानं पडण्यास सुरुवात झाली.  करुण नायरनं 89  धावा केल्या. केएल राहुलनं 15 ,अक्षर पटेलनं 9 , ट्रिस्टन स्टब्सनं 1 रन करुन बाद झाला. आशुतोष शर्मा 17 आणि विपराज निगम 15  धावा करुन बाद झाले.

तिलक वर्माचं अर्धशतक अन् मुंबईच्या 205  धावा

दिल्लीचा विजयरथ रोखायचा या इराद्यानं मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन यांनी केली केली. रोहित शर्मा चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.  त्यानं 18  धावा केल्या. तर, रिकल्टन यानं 41 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवनं 40  धावा केल्या. तिलक वर्मानं सलग दुसऱ्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं.  रेयान रिकल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर आणि रोहित शर्मा यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं  200 धावांचा टप्पा ओलांडला. मुंबईनं 20 ओव्हरमध्ये 5 बाद 205  धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्मानं 59  धावा केल्या.  दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादव, विपराज निगम यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या तर मुकेश कुमारला 1 विकेट मिळाली. 

मुंबई इंडियन्स :  रोहित शर्मा, रेयान रिकलटन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

दिल्ली कॅपिटल्स: जॅक फ्रेजर-मॅक्गर्ग, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिशेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये  कशेडी घाटात ट्रक उलटला
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये कशेडी घाटात ट्रक उलटला
सराफ व्यवसायिकाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीची पोलिसात धावा, दोघांना अटक
सराफ व्यवसायिकाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीची पोलिसात धावा, दोघांना अटक
Chhagan Bhujbal : शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा; शरद पवारांचं कौतुक करत छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला
शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा; शरद पवारांचं कौतुक करत छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला
रशियाच्या व्लादीमीर पुतीन यांचा PM नरेंद्र मोदींना फोन; डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत
रशियाच्या व्लादीमीर पुतीन यांचा PM नरेंद्र मोदींना फोन; डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये  कशेडी घाटात ट्रक उलटला
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये कशेडी घाटात ट्रक उलटला
सराफ व्यवसायिकाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीची पोलिसात धावा, दोघांना अटक
सराफ व्यवसायिकाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीची पोलिसात धावा, दोघांना अटक
Chhagan Bhujbal : शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा; शरद पवारांचं कौतुक करत छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला
शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा; शरद पवारांचं कौतुक करत छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला
रशियाच्या व्लादीमीर पुतीन यांचा PM नरेंद्र मोदींना फोन; डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत
रशियाच्या व्लादीमीर पुतीन यांचा PM नरेंद्र मोदींना फोन; डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2025 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2025 | सोमवार
Vidarbha Rain: विदर्भात मुसळधार पावसाचा कहर!धरणांचे दरवाजे उघडले,पूराच्या पाण्यात जनजीवन ठप्प,कुठे काय परिस्थिती?
विदर्भात मुसळधार पावसाचा कहर!धरणांचे दरवाजे उघडले,पूराच्या पाण्यात जनजीवन ठप्प,कुठे काय परिस्थिती?
Narendra Modi : अमेरिकेच्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक, 7 केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार, दिल्लीत घडामोडी वाढल्या
अमेरिकेच्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक, 7 केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार
CM देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील; महायुतीच्या मंत्र्यांनी दिली माहिती
CM देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील; महायुतीच्या मंत्र्यांनी दिली माहिती
Embed widget