Sagittarius Weekly Horoscope: धनु राशीला पुढचे 7 दिवस नशीब साथ देणार! अविवाहितांचे लग्न ठरण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Sagittarius Weekly Horoscope 10 February To 16 February 2025 : धनु राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा धनु राशीसाठी लाभदायी असणार? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Sagittarius Weekly Horoscope 10 To 16 February 2025: हिंदू दिनदर्शिकेनुसार, फेब्रुवारी महिन्याचा 10 ते 16 फेब्रुवारी हा दुसरा आठवडा लवकरच सुरु होत आहे. हा नवीन आठवडा धनु (Sagittarius) राशीसाठी नेमका कसा असणार आहे? धनु राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृश्चिक राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु राशीची लव्ह लाईफ (Sagittarius Love Horoscope)
धनु राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात नवीन सदस्य येण्याची चिन्हे आहेत. वैवाहिक जीवनात जुने मतभेद कायम राहू शकतात. जिव्हाळ्याच्या नात्यात प्रेम आणि विश्वास राहील. प्रेमसंबंध दृढ होतील. विवाहयोग्य तरुणांचे विवाह निश्चित केले जाऊ शकतात. या आठवड्यात तुमचे मन सामाजिक आणि धार्मिक कार्यात मग्न राहील.
धनु राशीचे करिअर (Sagittarius Career Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे. या आठवड्यात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नशीब तुमच्या प्रत्येक पावलावर साथ देत असल्याने तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात तुमचे सर्वोत्तम देऊ शकाल. आठवडाभर तुमच्यामध्ये सकारात्मक विचार आणि सकारात्मक ऊर्जा राहील. तुम्ही केवळ पुढे जाल आणि कामाच्या ठिकाणी सर्व जबाबदाऱ्या स्वीकाराल तर चांगले परिणाम देण्यातही यशस्वी व्हाल.
धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)
धनु राशीचे जे विद्यार्थी परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करत आहेत, त्यांना आठवड्याच्या सुरुवातीला बहुप्रतिक्षित आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. व्यवसाय वाढवण्याच्या योजना सफल होताना दिसतील. आठवड्याच्या शेवटी तुम्ही एखादा मोठा व्यवसाय करार करू शकता. परदेशात आपले करियर आणि बिझनेस बनवण्याच्या प्रयत्नात असलेले लोक मोठे यश मिळवू शकतात.
धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope)
धनु राशीच्या लोकांनी आरोग्य सांभाळा, संसर्ग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा. हात आणि पायामध्ये ताण आणि वेदना असू शकते. रोज मोहरी किंवा तिळाच्या तेलाने मसाज करा.
शुभ तारीख: 09,13,14
शुभ रंग: लाल, पिवळा, पांढरा
शुभ दिवस: मंगळवार, गुरुवार, सोमवार
खबरदारी
नकारात्मक विचार टाळा आणि अनैतिक कामांपासून दूर राहा.
हेही वाचा>>>
Scorpio Weekly Horoscope: वृश्चिक राशीच्या लोकांचे पुढचे 7 दिवस कसे जाणार? रागावर संयम, जोडीदाराच्या भावनांचा आदर करा, साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
