Holi 2024 : आला होळीचा सण लय भारी! तुमच्या राशीनुसार 'या' रंगांनी खेळा होळी, नांदेल सुख-समृद्धी
Holi Lucky Colours : यंदा रंगांचा उत्सव 25 मार्चला साजरा होत आहे. या दिवशी राशीनुसार रंग खेळणं शुभ मानलं जातं. तुमच्यासाठी राशीनुसार कोणत्या रंगांनी रंग खेळणं ठरेल शुभ? जाणून घ्या
Holi 2024 : भारतातील प्रत्येकजण होळी (Holi) या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. होळीच्या दिवशी रंग खेळायला-मित्रमैत्रिणींसोबत मज्जा करायला प्रत्येकालाच आवडतं. ज्योतिषशास्त्रानुसार, रंगपंचमीच्या दिवशी आपण वापरत असलेल्या रंगांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. यंदा 24 होलिका दहन, तर 25 मार्चला रंगपंचमीचा उत्सव रंगत आहे. रंगांचा हा सण आयुष्यात अनेक आनंद घेऊन येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, होळीला खेळताना राशीनुसार रंगांचा वापर केल्यास खूप फायदे देऊ शकतात. या रंगांमुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल आणि घरात सुख-समृद्धी नांदेल. ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या राशीसाठी कोणता रंग शुभ ठरेल? जाणून घ्या.
मेष आणि वृश्चिक (Aries and Scorpio)
मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशींचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळाचा रंग लाल असतो. म्हणूनच या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी लाल, गुलाबी रंगाचा आणि गुलालाचा वापर करावा, असं केल्याने तुम्हाला अपार लाभ मिळेल.
वृषभ आणि तूळ (Taurus and Libra)
वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्राचा रंग पांढरा आहे. परंतु होळीच्या दिवशी पांढऱ्या रंगाने होळी खेळता येत नाही, त्यामुळे वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांनी राखाडी आणि चंदेरी रंगांनी होळी खेळणं शुभ मानलं जातं. यामुळे तुम्हाला अनेक लाभ मिळतील आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल.
मिथुन आणि कन्या (Gemini and Virgo)
या दोन्ही राशींचा स्वामी बुध आहे. बुधचा रंग हिरवा मानला जातो, त्यामुळे या दोन राशींच्या व्यक्तींनी हिरव्या रंगाने होळी खेळल्यास त्यांना सुख-समृद्धी लाभेल. हिरवा रंग मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणि शांति आणतो, असं म्हटलं जातं. या व्यतिरिक्त तुम्ही पिवळ्या, केशरी आणि गुलाबी रंगांनीही होळी खेळू शकतात.
कर्क आणि सिंह (Cancer and Leo)
कर्क आणि सिंह राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. या राशीच्या लोकांनी भगव्या, पिवळ्या आणि चंदेरी रंगांनी होळी खेळावी. या दोन राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी काळा आणि निळा रंग वापरू नये.
मकर आणि कुंभ (Capricorn and Aquarius)
मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनिदेवाचा रंग काळा किंवा निळा आहे. होळीला निळ्या रंगाने रंग खेळणं तुमच्यासाठी शुभ ठरेल, शनिदेवाची तुमच्यावर कृपा राहील. परंतु तुम्ही होळीला लाल, पिवळा आणि केसरी रंग वापरू नये.
धनु आणि मीन (Sagittarius and Pisces)
धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरू आहे, त्यांचा आवडता रंग पिवळा मानला जातो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी लाल, पिवळा आणि केशरी रंगांनी होळी खेळावी. होळीच्या दिवशी या दोन राशीच्या लोकांनी काळा, निळा, तपकिरी आणि राखाडी रंगांनी खेळणं टाळावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani 2024 : ऐन होळीच्या काळात होणार शनीचा उदय; लागणार चंद्रग्रहण, 'या' 3 राशी कमावणार बक्कळ पैसा