Hiraman Khoskar on Road : रस्त्ता नसल्यानं गरोदर महिला दगावली, हिरामन खोसकर सभागृहात आक्रमक
Hiraman Khoskar on Road : रस्त्ता नसल्यानं गरोदर महिला दगावली, हिरामन खोसकर सभागृहात आक्रमक
रस्त्या अभावी झाला गरदोर महिलेचा मृत्यू. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या जिल्ह्यातील घटना. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील धक्कादायक घटना. वनिता भगत या गरोदर महिलेचा रुग्णालयात उपचार घेताना झाला मृत्यू. वनिता यांच्या पोटात दुखायला लागल्याने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जुनवणेवाडी पाड्यापासून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी रस्ता नसल्यानं गरोदर महिलेला तीन- साडेतीन किलोमीटर करावी लागली पायपीट.पायपीट करून रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. रस्ता असता तर वेळीच झाले असते उपचार महिला आणि बाळाचा जीव वाचला असता स्थानिकांची भावना.