BJP in Lok Sabha Result 2024 : नेत्यांच्या अति आत्मविश्वासामुळे भाजपला केवळ 240 जागा - ऑर्गनायझर
४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला केवळ २४० जागा मिळाल्या, याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांचा अति आत्मविश्वासामुळे, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर या मासिकात करण्यात आलीय. संघाचे स्वयंसेवक रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. महाराष्ट्रात अजित पवारांसोबत हातमिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपला झटका बसल्याचं ते म्हणाले. तसंच भाजप आणि शिदेंकडे आवश्यक बहुमत असूनही अजित पवारांशी हातमिळवणी का केली, असा सवाल रतन शारदा यांनी लेखात विचारलाय.
संघाने काम केलं नाही हा आरोप निरर्थक
स्थानिक भाजप नेत्यांनी संघ विचार संस्थांशी संपर्क केला का, ऑर्गनायझरमधून सवाल
२६/११ ला संघाचा कट म्हणणारे नेते भाजपमध्ये आले?
कृपाशंकर सिंह यांच्या प्रवेशावर ऑर्गनायझरमधून टीका
२६/११ प्रकरणी संघावर आरोप करणारे कोणतीही तमा न बाळगता भाजप नेते झाले
निष्कारण राजकारण करत बसल्याचे महाराष्ट्र उदाहरण
शरद पवार घरातील भांडणे सोडवण्यात व्यस्त राहिले असते
अजित पवारांना सोबत घेण्याची काय गरज होती
आयेगा तो मोदी, चारसो पार, हा अतिआत्मविश्वास ?
जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं का?
भाजपचे नेते अनरीचेबल होते
संघाचे माजी घाटकोपर विभाग संघचालक व स्तंभलेखक रतन शारदा यांचा ऑर्गनायझर मध्ये लेख