(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 08 August 2024
एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 3 PM टॉप हेडलाईन्स 08 ऑगस्ट 2024
विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत वक्फ
बोर्ड सुधारणा विधेयक सादर, मुस्लीम महिलांसोबतच बिगर मुस्लिमांनाही मिळणार वक्फ बोर्डात प्रतिनिधित्त्व...
हायकोर्टाच्या नकारानंतर सुप्रीम कोर्ट हिजाब बंदीविरोधात सुनावणीसाठी तयार, मुंबईतल्या एनजी आचार्य अँड डी के मराठे कॉलेजमधल्या हिजाब बंदीविरोधात उद्याच सुनावणी
बोगस संशयित दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश, ४०० हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती...
दिव्यांग प्रमाणपत्रातल्या एबीपी माझानं उघड केलेल्या बोगसगिरीची एसआयटीमार्फत चौकशी करा, विजय वडेट्टीवारांची मागणी, बच्चू कडू म्हणाले, आम्ही आमच्या पद्धतीनं चोप देऊ..
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी जमा होणार, दिंडोरीच्या सभेत अजित पवारांचा पुनरुच्चार
उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशीही गाठीभेटींचा सिलसिला, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सुनीता केजरीवालांची भेट तर संध्याकाळी सोनिया गांधींना भेटणार