Paris Olympics: पॅरिसमधून आणखी एक वाईट बातमी; आता कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत, शिस्तभंगाचा आरोप, हद्दपार करण्याची शक्यता
Paris Olympics 2024 : एकीकडे विनेश फोगाट अपात्र ठरली आहे, तर दुसरीकडे अंतिम अडचणींत सापडली आहे.
Paris Olympics 2024 : वाढलेल्या वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून (Paris Olympic 2024) विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अपात्र ठरवण्यात आलं आणि कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न भंगलं. विनेश फोगाटचं प्रकरण ताजं असतानाच, आता पैलवान अंतिम पंघाल (Antim Panghal) अडचणींत सापडली आहे. अंतिमनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 53 किलो वजनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. हा तोच वजनी गट आहे, ज्यामधून आधी भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाट खेळत होती. आश्चर्याची बाब म्हणजे, एकीकडे विनेश फोगाट अपात्र ठरली आहे, तर दुसरीकडे अंतिम अडचणींत सापडली आहे.
महिला कुस्तीपटू अंतिम आणि तिच्या बहिणीची पॅरिसमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे. अंतिमने ज्या गावात सामना सुरू होता, तिथून आपलं काही सामाना आणण्यासाठी स्वतःचं अधिकृत ओळखपत्र तिच्या छोट्या बहिणीला दिलं आणि सुरक्षारक्षकांनी तिला पकडलं. अशा परिस्थितीत फ्रेंच अधिकाऱ्यांकडून शिस्तभंगाचा आरोप झाल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अखेर भारतीय कुस्तीपटू अंतिम, तिची लहान बहिण आणि सपोर्ट स्टाफची रवानगी पुन्हा भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खरंतर, महिलांच्या 53 किलो वजनी गटातील आपला पहिला सामन्यात गमावल्यानंतर कुस्तीपटू अंतिम स्पर्धेतून बाहेर पडली. तिचं नामांकित प्रशिक्षक भगतसिंह आणि वास्तविक प्रशिक्षक विकास ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे ती गेली. तिनं आपल्या बहिणीला स्वतःचं ओळखपत्र दिलं आणि जिथे सामना होता, तिथून आपलं सामना आणण्यास सांगितलं. अंतिमचं ओळखपत्र घेऊन बहिण स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाली खरी, पण अंतिमचं सामना घेऊन परतताना तिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं.
अंतिमच्या बहिणीची पोलिसांनी चौकशी केली आणि तिचा जबाब नोंदवण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्यानंतर 19 वर्षीय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन कुस्तीपटू अंतिमलाही तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी बोलावलं. एवढंच नाहीतर, अंतिमचे वैयक्तिक सपोर्ट स्टाफ विकास आणि भगत कथितरित्या पॅरिसमध्ये मद्यधुंद अवस्थेत टॅक्सीमधून फिरत होते आणि त्यानंतर त्यांनी टॅक्सीचं भाडं देण्यास मनाई केली, त्यानंतर ड्रायव्हरनं पोलिसांना बोलावलं. त्यामुळे त्यांच्याही अडचणींत वाढ झाली आहे.
IOA कडून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न
IOA च्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "आम्ही हे प्रकरण आता शांत करण्याचा प्रयत्न करत आहोत." सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "आमची परिस्थिती वाईट आहे, आमचे सुरक्षा अधिकारी परिस्थिती हाताळत आहेत. अंतिम, तिचा सपोर्ट स्टाफ आणि तिच्या बहिणीला हद्दपार केलं जाऊ शकतं." शिस्तभंगाबाबत आयओएनं काहीही सांगितलेलं नसलं तरी एका सूत्रानं पीटीआय या वृत्तसंस्थेला संपूर्ण माहिती दिली. सूत्रानं सांगितलं की, "स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये जाण्याऐवजी, ती हॉटेलमध्ये पोहोचली जिथे तिचे प्रशिक्षक भगतसिंह आणि सहकारी कुस्तीपटू विकास, जो प्रत्यक्षात तिचा प्रशिक्षक आहे, थांबले होते. नंतर तिनं आपल्या बहिणीला स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये जाऊन सामान घेऊन परत येण्यास सांगितलं. तिच्या बहिणीला दुसऱ्याच्या कार्डावर प्रवेश केल्यामुळे पकडण्यात आलं आणि तिचा जबाब नोंदवण्यासाठी तिला पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. विकास यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा घटनेत आपला सहभाग असल्याचं स्पष्टपणे नाकारलं. ते म्हणाले की, हे तुला कोणी सांगितलं? माझ्यासमोर शेवटचा आणि त्याची बहीण बसली आहे.