एक्स्प्लोर

Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार

Umraga Vidhansabha: प्रवीण स्वामी यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका. आमदार प्रवीण स्वामी यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे असून ते रद्द करावे यासाठी याचिका दाखल.

धाराशिव: उमरगा विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या  औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीतील पराभूत उमेदवार माजी आमदार ज्ञानराज चौगुले  यांनी प्रवीण स्वामी यांच्याविरुद्ध ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर  फेब्रुवारी मध्ये सुनावणी होणार आहे.  या संदर्भात प्रथमतः  ज्ञानराज चौगुले यांनी जात पडताळणी समिती धाराशिव यांच्याकडं रीतसर तक्रार दाखल केली होती. परंतू समितीने सदर प्रकरणी सुनावणी घेण्याचे अधिकार समितीस नसल्याचे कारण देत सदर तक्रार फेटाळली होती. त्यानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ज्ञानराज चौगुले यांच्या या याचिकेवर उच्च न्यायालयात फेब्रुवारी महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून प्रवीण स्वामी यांना तशी नोटीस बजावण्यात आली आहे. 

प्रवीण स्वामी यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्ञानराज चौगुले यांचा निसटता पराभव केला होता. उमरगा विधानसभा मतदारसंघात प्रवीण स्वामी यांना 94,550 मते मिळाली होती. तर ज्ञानराज चौगुले यांना 91142 मते मिळाली होती. ज्ञानराज चौगुले या मतदारसंघातील तीन टर्मचे आमदार होते. त्यामुळे प्रवीण स्वामी यांनी निसटता विजय मिळवल्याची चुटपूट ज्ञानराज चौगुले यांना लागून राहिली होती. त्यामुळे माजी आमदार  चौगुले यांनी कोर्टात धाव घेतली आहे. यामुळे आता प्रवीण स्वामी यांच्या आमदारकीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. आता प्रवीण स्वामी कोर्टात कशाप्रकारे आपली बाजू मांडतात, हे पाहावे लागेल.

ठाकरेंची साथ सोडून ज्ञानराज चौगुले शिंदे गटात

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसला होता. लोकसभा निवडणुकीतही धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांना या लोकसभा मतदारसंघात प्रचंड मोठा लीड मिळाला होता. त्यानंतर उमरगा विधानसभा मतदारसंघातही ज्ञानराज चौगुले यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

आणखी वाचा

धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

महत्त्वाच्या बातम्या

Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Pratap Sarnaik on Eknath Shinde: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget