एक्स्प्लोर

PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी

PSU Bank Stake Sell : केंद्र सरकार पाच बँकांमधील भागिदारी कमी करणार आहे. याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई : केंद्र सरकारनं क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे 10 हजार कोटींचा फंड उभारण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांच्या योजनेला मंजुरी दिली आहे.  बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओव्हरसी बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांचा त्यामध्ये समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बँका 2025 च्या चौथ्या तिमाहीत छोट्या हप्त्यांमध्ये रक्कम उभी करु शकतात. 

2026 पर्यंत सरकारची भागिदारी कमी होणार 

सीएनबीसी -टीव्ही 18 नं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती प्रबंधन विभागानं ऑफर फॉर सेलद्वारे या बँकांमधील हिस्सेदारी विकण्याची ऑर्डर मिळाली आहे. सरकार ऑगस्ट 2026 मध्ये  पाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील भागिदारी 25 टक्क्यांपर्यंत कमी केली जाणार आहे. त्यामुळं या बँकांमधील सरकारची भागिदारी 2026 पर्यंत 25 टक्क्यांपर्यंत येईल. या बँका वित्तीय सेवा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणात आहेत. 

सरकारची या बँकांमध्ये भागिदारी किती? 

बीएसईवरील फायलिंगनुसार डिसेंबरला संपलेल्या तिमाहीच्या शेवटी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सरकारची भागिदारी 79.6 टक्के आहे. पंजाब अँड सिंध बँकेत 98.25 टक्के, इंडियन ओव्हरसीज बँकेत 96.38 टक्के, यूको बँकेत 95.39 टक्के आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियात 93.08 टक्के भागिदारी सरकारकडे आहे. सध्याच्या शेअरच्या मूल्यानुसार पाच बँकांमध्ये सरकारची अतिरिक्त भागिदारी जवळपास 50000 हजार कोटी रुपयांची आहे. 

या बँकांच्या शेअरमध्ये तेजी 

या आठवड्यात सोमवारी शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड होता. गुंतवणूकदारांचे 12.61 लाख कोटी रुपये सोमवारी बुडाले होते. मंगळवारी मात्र भारतीय शेअर बाजारात वेगळं चित्र पाहायला मिळालं. यूको बँकेचा शेअर 15 टक्क्यांनी वाढून 44.32 रुपयांवर पोहोचला. इंडियन ओव्हरसीज बँकेचा शेअर 19.24 टक्क्यांनी वाढून 54.11 रुपयांवर बंद झाला. सेंट्रल बँकेच्या शेअरमध्ये 18.36 टक्के तेजी पाहायला मिळाली. या बँकेचा शेअर 55.51 रुपयावंर बंद झाला. बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर 52.77 रुपयांवर बंद झाला. पंजाब अँड सिंध बँकेचा शेअर 48.30 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरमध्ये 14.67 टक्के तेजी पाहायला मिळाली. 

इतर बातम्या : 

EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार

State Bank : स्टेट बँकेची हर घर लखपती योजना बनवेल करोडपती, 593 रुपयांपासून गुंतवणुकीची संधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
Embed widget