अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
राज्यातील अनेक भागात थंडीचा कडाका कमी झाला असून धुके आणि ढगाळ हवामानाने किमान तापमानात काहीशी वाढ झालेली दिसते
Weather update: आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे .पश्चिमे चक्रवतांच्या तीव्रतेमुळे राज्यात थंडी कमी अधिक होत असून उत्तरेकडील राज्यांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळत आहे .दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातही गारठा कमी झालाय .ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे . तूरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरींच्या पावसाचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे . (IMD forecast)
हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यातील अनेक भागात थंडीचा कडाका कमी झाला असून धुके आणि ढगाळ हवामानाने किमान तापमानात काहीशी वाढ झालेली दिसते .तरीही पहाटे गारवा आणि धुक्याची चादर बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे . .हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार राज्यात येत्या काही दिवसात ढगाळ हवामानाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे . त्यामुळे तापमानात चढ उतार राहू शकेल असा अंदाज देण्यात आलाय . हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसात महाराष्ट्रात किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होणार आहे .वातावरण ढगाळ असल्याने गारठा कमी होण्याची शक्यता आहे .
पावसाला पोषक वातावरण
राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाल्याने ढगाळ वातावरण आहे. परिणामी किमान तापमान वाढला आहे. येत्या 24 तासात थंडीचा जोर कमी होणार असून किमान तापमान 3 ते 6 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी मध्य महाराष्ट्रासह विदर्भात किमान तापमानाची सामान्य तापमानाहून 1 ते 3 अंशांनी अधिक नोंद झाली. राज्यात येत्या दोन दिवसात पावसाला पोषक हवामान तयार झालं असून हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला जपण्याचा सल्ला प्रादेशिक हवामान केंद्राने दिलाय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत असून पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तर कोकणासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय. किमान तापमान येत्या दोन दिवसात हळूहळू वाढणार असून दोन ते तीन अंशांनी त्यात वाढ होणार आहे. महाराष्ट्राच्या तापमानावर परिणाम होणार असून सध्या वातावरणात असलेला गारठा काहीसा कमी होणार आहे. किमान तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.