एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yoajana : राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा महिलांकडून करण्यात येत आहे.

मुंबई : महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या 2 कोटी 52  लाख महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात आली आहे. आतापर्यंत महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सहा हप्त्यांचे एकूण 9000 रुपये मिळालेले आहेत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे.  राज्य सरकारनं डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम 24 डिसेंबरपासून वर्ग करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळं जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये महिलांना मिळेत का हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांचं लाडकी बहीण योजनेसंदर्भातील वक्तव्य देखील चर्चेत आहे. 

लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना 1500 रुपये देण्यात येतात. याशिवाय सरकारनं काही अटी देखील ठेवल्या आहेत. डिसेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार 2 कोटी 52 लाख महिलांच्या खात्यात 1500 रुपये पाठवण्यात आले होते. आता, जानेवारी महिन्यातील रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. 

2100 रुपये अर्थसंकल्पानंतर? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा स्थापन होण्यासाठी गेमचेंजर ठरली होती. महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या जाहीर भाषणांमधून महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यास लाडक्या बहिणींना 1500 च्या जागी 2100 रुपये देणार म्हटलं होतं. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल, असं म्हटलं होतं. त्यामुळं राज्य सरकारचा अर्थसंकल्प  सादर होईल तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत 

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते चर्चेत आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी स्वत:हून या योजनेतून नाव काढून घ्यावं. महिलांना आतापर्यंत जेवढी रक्कम देण्यात आली ती परत मागण्यात अर्थ नाही. आतापर्यंत जे दिलं ते महिलांना अर्पण केलं असं समजू मात्र ज्या महिला पात्र नाहीत त्यांनी स्वत: हून नावं काढून घ्यावीत, अन्यथा दंडासह वसुली केली जाईल असं म्हटलं होतं. 

दरम्यान, लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे. 

इतर बातम्या : 

केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? सातव्या हप्त्याचे 1500 रुपये कधी येणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफाTop 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Beed News: वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात समर्थकांची महत्त्वाची बैठक, धनंजय मुंडे पहाटे परळीत दाखल, आता पुढे काय घडणार?
वाल्मिक कराडने जिथून बीडचा राज्यशकट चालवला त्याच जगमित्र कार्यालयात महत्त्वाची बैठक, धनुभाऊ परळीत दाखल
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आतापर्यंत किती रक्कम मिळाली?
मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? सातव्या हप्त्याचे 1500 रुपये कधी येणार?
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Embed widget