एक्स्प्लोर

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Beed news: संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडला मकोका लागला. परळीत वातावरण तापलं, कराड समर्थकांनी परळीत टायर पेटवले. धनंजय मुंडे परळीच्या दिशेने रवाना

मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला चांगलीच गती आली आहे. देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयाखाली वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाल्मिक कराड हे राज्याचे नागरी व अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर मंगळवार संध्याकाळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. अवघ्या 10 मिनिटांची चर्चा झाल्यानंतर धनंजय मुंडे या बैठकीतून बाहेर पडले. यानंतर धनंजय मुंडे थेट परळीच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे इतका महत्त्वाचा कार्यक्रम सोडून धनंजय मुंडे परळीला का गेले, यावरुन आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

धनंजय मुंडे हे परळीला जाण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जात आहेत. त्यापैकी कारण म्हणजे परळी आणि बीड जिल्ह्यात तापलेले वातावरण शांत करण्याची गरज आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मारेकऱ्यांना पकडण्यात झालेली दिरंगाई, वाल्मिक कराडला शोधण्यात पोलिसांना आलेले अपयश आणि एसआयटी पथकात कराड यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांचा असलेला समावेश अशा आरोपांमुळे बीड प्रकरणात सरकारची प्रतिमा काहीशी मलीन झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्यासाठी महायुतीच्या गोटातूनही दबाव वाढल्याची चर्चा आहे. मात्र, तुर्तास अजितदादांनी धनंजय मुंडे यांना अभय दिले आहे. परंतु, यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत आहे.

वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागावा आणि निष्पक्ष: तपासासाठी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय याप्रकरणाच्या तपासातील प्रत्येक त्रुटींवर बोट ठेवत आहेत. अशातच वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर परळीत कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी परळीत टायरची जाळपोळ आणि दुकाने बंद करण्याचा उद्योग गेला. अजित पवार यांनी कालच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याकडून परळीतील परिस्थितीची माहिती घेतली. परळी आणि बीड जिल्ह्यातील वातावरण आणखी चिघळल्यास ते सरकारच्या प्रतिमेला मारक ठरु शकते. त्यामुळे अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांनाच तेथील परिस्थिती हाताळायला परळीत पाठवले असावे, अशी चर्चा आहे.

मोदींच्या बैठकीपासून धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक दूर ठेवलं?

संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठेही थेट सहभाग दिसून आलेला नाही. मात्र, वाल्मिक कराड हा मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडे 'कलंकित' झाले आहेत. त्यामुळेच अशा कलंकित नेत्याला पंतप्रधान मोदींपासून दूर ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांना परळीला पाठवण्यात आले असावे का, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महायुतीचे आमदार आणि नेत्यांसोबत संवाद साधणार आहेत. मोदींनी या कार्यक्रमासाठी तब्बल अडीच तासांचा वेळ राखून ठेवला आहे. मात्र, संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन बीडमधील वातावरण चिघळले असताना धनंजय मुंडे आणि मोदींची भेट झाल्यास त्याची विनाकारण चर्चा होऊ शकते. भविष्यात वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांच्यावर आणखी गंभीर दोषारोप झाल्यास आणि कोणतीही कारवाई न झाल्यास त्याचा संबंध मोदींच्या भेटीशी जोडला जाऊ शकतो. धनंजय मुंडे गंभीर आरोपांच्या गर्तेत सापडले असूनही मोदींनी काही केले नाही, असा संदेश जनमानसात जाऊ शकतो. एकूणच या सगळ्यामुळे थेट पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला बट्टा लागू शकतो. त्यामुळे धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यासाठी परळीला पाठवण्यात आल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा

वाल्मिक कराडभोवतीचा तपासाचा फास कसा आवळला? त्या 6 फोन कॉलमुळे मकोका लागला, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget