मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माचे अनोखे द्विशतक
Mumbai Indians : नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा याने ईशान किशनच्या साथीने आक्रमक सुरुवात केली.

Most Sixes For Mumbai Indians : वानखेडे स्टेडिअमवर मुंबईच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडलाय. सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीच्या बळावर मुंबईने २१८ धावांचा डोंगर उभारला. नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा याने ईशान किशनच्या साथीने आक्रमक सुरुवात केली. दोघांनी पावरप्लेमध्ये ६१ धावांची भागिदारी केली. कर्णधार रोहित शर्मा याने छोटेखानी खेळी करत मोठा विक्रम नावावर केला. रोहित शर्माने १८ चेंडूत २९ धावांचे योगदान दिले. यामध्ये रोहित शर्मा याने दोन खणखणीत षटकार लगावले. या षटकारासह रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी २०० षटकार लगावण्याचा पराक्रम केलाय.
रोहित शर्माचा षटकाराचा विक्रम -
गुजरातविरोधात रोहित शर्मा याने २९ धावांची छोटेखानी खेळी केली. या खेळीत रोहित शर्मा याने तीन चौकार आणि दोन खणखणीत षटकार लगावले. यासह रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये मोठा पराक्रम केलाय. रोहित शर्मा याने मुंबईसाठी २०० षटकार पूर्ण केले आहेत. मुंबईसाठी सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम कायरन पोलार्डच्या नावावर आहे. पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी २२३ षटकार लगावले आहेत. रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकार हार्दिक पांड्या आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने मुंबईसाठी ९८ षटकार लगावले आहेत.
मुंबईसाठी सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज -
मुंबईसाठी पोलार्ड याने सर्वाधिक षटकार लगावले आहेत. पोलार्ड याने २२३ षटकार लगावले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रोहित शर्माने २०० षटकार लगावले आहेत. हार्दिक पांड्या याने ९८ षटकार लगावले असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर ईशान किश तर पाचव्या क्रमांकवर सुर्या आहे. ईशान किशन याने 71 सामन्यात 88 षटकार लगावले आहेत. सूर्यकुमार यादव याने 81 षटकार लगावले आहेत. अंबाती रायडू, (Ambati Rayudu), क्विंटव डीकॉक. क्रुणाल पांड्या, लेंडल सिमंस आणि हरभजन सिंह यांचा या यादीत समावेश आहे.
एबीला टाकले मागे -
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याच्या बाबतीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. रोहित शर्मा याने एबी डिव्हिलिअर्स याला मागे टाकले. रोहित शर्मा याचे आयपीएलमध्ये २५२ षटकार झाले आहेत. एबी डिव्हिलिअर्स याचे आयपीएलमध्ये २५१ षटकार आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेल याने आयपीएलमध्ये ३५७ षटकार लगावले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रोहित तर तिसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलिअर्स आहे. चौथ्या क्रमांकावर धोनी आहे... धोनीने आयपीएलमध्ये २३९ षटकार मारले आहेत. तर पाचव्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराट कोहलीने २२९ षटकार लगावलेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
