एक्स्प्लोर

IPL MI Jersey : मुंबईची पलटन महिला संघाची जर्सी घालून मैदानात उतरणार, 'हे' आहे कारण

IPL Mumbai Indians to Wear WPL Jersey : आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ महिला संघाची (WPL) जर्सी घालून मैदानावर उतरणार आहे. यामागचं कारण जाणून घ्या.

Mumbai Indians to Don WPL Jersey : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगणार आहे. आज (15 एप्रिल, रविवारी) वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ महिला प्रीमियर लीग (WPL) मुंबईची जर्सी घालून मैदानावर उतरणार आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना ESA दिनाच्या (सर्वांसाठी शिक्षण आणि क्रीडा) दिवशी खेळवला जात आहे. या जो रिलायन्स फाऊंडेशन एक उपक्रम आहे.

मुंबईची पलटन महिला संघाची जर्सी घालून मैदानात उतरणार

रिलायन्स फाऊंडेशनकडून (Reliance Foundation) सर्वांसाठी शिक्षण आणि क्रीडा या उद्देशाने ESA दिन (Education and Sports For All) साजरा केला जातो. ESA दिन हा निता अंबानी यांचा उपक्रम आहे. याचं निमित्तानं आज मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी घालून उतरणार आहे. ESA दिन हा सर्वांना विशेषत: मुलींना समान शिक्षण आणि खेळाच्या संधी मिळण्यासाठीचा उपक्रम आहे.

मुंबई इंडियन्स संघाचा हा समान मुलींसाठी समर्पित असणार आहे. निता अंबानी यांनी या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितलं की, ''महिलांना खेळामध्ये करिअर करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. मुलींना खेळामध्ये समान संधी मिळावी यासाठीचा रिलायन्स फआऊंडेशनचा हा उपक्रम आहे. मुंबईचा सामना पाहण्यासाठी सुमारे 19 हजार मुली मैदानावर येणार आहेत आणि संघ त्या मुलींसाठी खेळेल.'' 

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी खास उपक्रम

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI) संघ आणि नितीश राणाच्या (NItish Rana) नेतृत्वात कोलकाता (KKR) संघ यांच्यात लढत होणार आहे.  यावेळी वानखेडे स्टेडियमवर 19,000 हून अधिक मुली मुंबई संघाला प्रोत्साहन देण्यासाठी येण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर, मुंबई महिला संघाची गोलंदाजी प्रशिक्षक झुलन गोस्वामी आणि मुंबईचे पुरुष फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्डने सांगितलं की, या उपक्रमामुळे मुलींना खेळाकडे व्यवसाय आणि करिअर म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळेल.

MI vs KKR, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात 16 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 Points Table : लखनौवरील विजयानंतर पंजाबची गुणतालिकेत झेप, पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget