IPL 2023 Points Table : लखनौवरील विजयानंतर पंजाबची गुणतालिकेत झेप, पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर?
IPL Points Table : पंजाब किंग्सनं (PBKS) लखनौविरुद्ध 2 गडी राखून तर आरसीबीने दिल्लीवर विजय मिळवला आहे. यानंतर आता गुणतालिकेमध्ये बदल झाला आहे.
IPL 2023 Updated Points Table : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये शनिवारी डबल हेडर सामने खेळवण्यात आले. आयपीएलच्या 16व्या मोसमातील 21 व्या सामन्यात पंजाब किंग्स (PBKS) च्या संघाने लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघाचा 2 गडी राखून पराभव केला. पंजाबने (PBKS) या मोसमातील तिसरा विजय नोंदवला आणि आता गुणतालिकेत चौथे स्थान मिळवलं आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये सलग दोन पराभव स्वीकारल्यानंतर पंजाब किंग्स लखनौ विरुद्ध विजयी मिळवून पुन्हा टी20 लीगमध्ये (Indian Premier League) पुनरागमन केलं आहे. शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) दिल्ली कॅपिटल्स (DC) संघावर 23 धावांनी विजय मिळवला. हा दिल्लीचा सलग पाचवा पराभव होता. यानंतर आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) सध्याची परिस्थिती काय आहे जाणून घ्या.
IPL 2023 Points Table : राजस्थान गुणतालिकेत अव्वल
आयपीएल पॉइंट टेबलमध्ये (IPL Points Table) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानकडे सध्या 6 गुण आणि संघाचा नेट रनरेट 1.588 आहे. दुसऱ्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्स संघ (Lucknow Super Giants) आहे. लखनौ (LSG) संघाकडे सहा गुण आहे, तर नेट रनरेट 0.761 आहे. गुणतालिकेत गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघ तिसर्या तर पंजाब किंग्स (Punjab Kings) संघ चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या चार संघांकडे प्रत्येकी सहा गुण आहेत. मात्र, राजस्थानचा नेट रनरेट जास्त असल्यामुळे राजस्थान शर्यतीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
IPL 2023 Points Table : तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर?
सध्या, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ 4 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. संघाचा नेट रनरेट 0.711 आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ 4 गुणांसह सहाव्या स्थानावर असून रन रेट 0.225 आहे. पॉईंट्स टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) संघ सातव्या क्रमांकावर आहे. आरसीबीकडे सध्या 4 गुण असून संघाचा नेट रनरेट -0.316 आहे. गुणतालिकेत हैदराबाद (SRH) आठव्या तर मुंबई इंडियन्स (MI) नवव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (DC) संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी स्थानी आहे. दिल्लीचा आतापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. संघाने अद्याप खातंही उघडलं नसून दिल्ली सध्या दहाव्या क्रमांकावर आहे.
IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 पॉईंट्स टेब्ल
महत्त्वाच्या इतर बातम्या :