(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023, CSK vs LSG : चेन्नईनं पहिल्या विजयासह खातं उघडलं, मराठमोळ्या ऋतुराजसह मोईन अली ठरले विजयाचे शिल्पकार
CSK vs LSG, IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल 2023 मध्ये पहिला विजय मिळाला आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने मैदानात षटकारांचा वर्षाव करत लखनौच्या गोलंदाजांना पछाडलं.
Chennai Super Kings vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 मध्ये चेन्नईच्या (CSK) संघानं अखेर खातं उघडलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) पराभव केला आहे. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईने लखनौचा (LSG) 12 धावांनी पराभव केला. चेन्नईने चार वर्षांनंतर घरच्या मैदानावर उतरून विजय मिळवला. चेन्नईचा संघ 2019 नंतर या मैदानावर खेळायला उतरला होता. चेन्नईने दमदार घरवापसी करत लखनौला रोमहर्षक सामन्यात पराभूत केलं. मराठमोळा ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली हे विजयाचे शिल्पकार ठरले.
IPL 2023, CSK vs LSG : ऋतुराज आणि मोईन अली ठरले 'हिरो'
या सामन्यात ऋतुराजने 57 धावांची दमदार खेळी केली, तर मोईन अलीने 19 धावा केल्या. सोमवारी झालेल्या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरली. चेन्नई सुपर किंग्सच्या सलामीवीरांनी या सामन्याची आक्रमक सुरुवात केली. 'येलो आर्मी'मधील सलामीवीर ऋतुराज गायकवाडने मैदानात षटकारांचा वर्षाव करत लखनौच्या गोलंदाजांना पछाडलं. यामुळे CSK ने 10 षटकांपूर्वीच 100 धावांचा आकडा गाठला. ऋतुराज गायकवाडने लखनौविरोधात दमदार अर्धशतकी खेळी केली. आयपीएल 2023 मधील त्याची ही सलग दुसरी अर्धशतकी खेळी आहे.
IPL 2023, CSK vs LSG : चेन्नईनं पहिल्या विजयासह खातं उघडलं
मोईन अलीने 19 धावांची छोटेखानी दमदार खेळी केली. त्याने 13 चेंडूमध्ये तीन चौकार ठोकले. आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघाचा हा पहिला विजय आहे. याआधी गेल्या वर्षी दोन्ही संघांमध्ये एक सामना झाला होता. त्यामध्ये लखनौकडून चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नई संघाचं घरच्या मैदानावर वर्चस्व आहे. या मैदानावर चेन्नईने एकूण 22 पैकी 19 सामने जिंकले आहेत. केवळ तीन सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे.
IPL 2023, CSK vs LSG : केएल राहुलकडून निराशा हाती
लखनौ संघाचा कर्णधार केएल राहुल आयपीएल 2023 मध्ये फ्लॉप होताना दिसत आहे. यंदाच्या मोसमातील सलग दुसऱ्या सामन्यातही राहुलकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल 18 चेंडूत केवळ 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यामध्ये त्याने दोन चौकार लगावले.
IPL 2023, CSK vs LSG : चेन्नईकडून लखनौचा 12 धावांनी पराभव
चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्स संघाचा 12 धावांनी पराभव केला. ऋतुराज गायकवाड याने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर मोईन अली याने चार विकेट घेतल्या. चेन्नईने दिलेले 218 धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ संघाने 205 धावांपर्यंत मजल मारली. लखनौचा पराभव करत चेन्नईने आयपीएलच्या 16 व्या हंगमातील पहिला विजय नोंदवला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
CSK vs GT : 9 षटकार, 4 चौकारासह ऋतुराजने पाडला धावांचा पाऊस; 8 धावांनी हुकले शतक