एक्स्प्लोर

Ind vs Nz 1st Test : रोमांचक मोडवर पहिला कसोटी सामना; चौथ्या दिवशी सरफराज, ऋषभ पंतचा तडाखा, न्यूझीलंडला कसोटी जिंकण्यासाठी 107 धावांचे लक्ष्य

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे.

IND vs NZ 1st Test Day 4 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरू येथे खेळला जाणारा पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. खराब प्रकाश आणि मुसळधार पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच संपला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने केवळ 4 चेंडू खेळले, ज्यामध्ये संघाला आपले खातेही उघडता आले नाही. न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी 107 धावा करायच्या आहेत.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी सकाळी सरफराज खान आणि ऋषभ पंत यांच्यात 177 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून पहिले दोन सत्रे भारताच्या नावावर केले. सरफराजने 150 धावा केल्या, तर ऋषभ पंत 99 धावा करून बाद झाला. मात्र यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या.

एका सत्रात पलटला खेळ

त्यावेळी भारताने 3 विकेट गमावून 408 धावा केल्या होत्या. मात्र सरफराज खानची विकेट पडल्यानंतर टीम इंडियाची बॅटिंग संघर्ष करताना दिसली. परिस्थिती अशी होती की भारताने शेवटच्या 7 विकेट केवळ 54 धावांत गमावल्या. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात केएल राहुलला मॅट हेन्री आणि विल्यम ओरूर्केच्या घातक गोलंदाजीसमोर केवळ 12 धावा करता आल्या, तर रवींद्र जडेजालाही केवळ 5 धावा करता आल्या. अशाप्रकारे टीम इंडियाचा दुसरा डाव 462 धावांवर आटोपला.

न्यूझीलंडसमोर 107 धावांचे लक्ष्य 

एकेकाळी भारतीय संघ खूपच मजबूत स्थितीत असल्याचे दिसत होते. मात्र चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राने सामना न्यूझीलंडकडे हातात गेला. किवी संघाला चौथ्या डावात विजयासाठी 107 धावा करायच्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाहुण्या संघाला केवळ 4 चेंडू खेळता आले. न्यूझीलंडला एकही षटक खेळता आले नाही, तेव्हा मैदानावर दाट काळे ढग आले. अशा परिस्थितीत खराब प्रकाशामुळे पंचांनी वेळेआधीच स्टंप घोषित केले. काही वेळाने जोरदार पाऊस सुरू झाला.

हे ही वाचा -

Sarfaraz Khan Ind vs Nz Test : पहिल्या डावात भोपळा, दुसऱ्या डावात थेट दीडशतक; सरफराज खानचा अनोखा विक्रम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad pawar Birthday : शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?Parbhani Protest : परभणीतील घटनेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसानSanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलंPlaces of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad pawar Birthday : शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Mhada News : गुड न्यूज, म्हाडा मुंबईत पुढील 5 वर्षात अडीच लाख घरं बांधणार, घरांच्या किंमतीबाबत मोठी अपडेट 
मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाचं पाच वर्षात अडीच लाख घरं बांधण्याचं नियोजन 
Embed widget