Sarfaraz Khan Ind vs Nz Test : पहिल्या डावात भोपळा, दुसऱ्या डावात थेट दीडशतक; सरफराज खानचा अनोखा विक्रम
Sarfaraz Khan Record in Test : सरफराज खानने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.
Sarfaraz Khan Record in Test : सरफराज खानने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. कसोटीच्या पहिल्या डावात 0 धावा आणि दुसऱ्या डावात 150 धावा करण्याचा विक्रम करणारा सरफराज खान भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात सरफराज 0 वर आऊट झाला होता. पण दुसऱ्या डावात भारताचा युवा फलंदाज सरफराज खान 150 धावा करून बाद झाला. टीम साऊदीने त्याला आऊट केले. सरफराज आणि पंत यांच्यात चौथ्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी झाली.
𝑨𝒍𝒆𝒙𝒂 𝒑𝒍𝒂𝒚, 𝑰'𝒎 𝒖𝒏𝒔𝒕𝒐𝒑𝒑𝒂𝒃𝒍𝒆! 😎
— JioCinema (@JioCinema) October 19, 2024
Maiden century in Test cricket for the rising star, #SarfarazKhan 🌟#IDFCFirstBankTestTrophy #INDvNZ #TeamIndia #JioCinemaSports pic.twitter.com/vsB9IhfGTh
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात स्वस्तात गडगडला होता. यानंतर संघाला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारावी लागली. अशा परिस्थितीत या निर्णायक वेळी सरफराज खानची बॅट चालली. विराट कोहलीच्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सरफराजने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. यादरम्यान, त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत सचिनने पहिल्या डावात 0 धावा आणि दुसऱ्या डावात 136 धावा केल्या होत्या. सरफराजने 195 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या. सरफराज 150 धावा करून बाद झाला.
Bharat ki aan baan shaan 𝐒𝐚𝐫𝐟𝐚𝐫𝐚𝐳 𝐊𝐡𝐚𝐧 🔥#IDFCFirstBankTestTrophy #INDvNZ #TeamIndia #JioCinemaSports pic.twitter.com/mxdGP69mhM
— JioCinema (@JioCinema) October 19, 2024
पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात शतक झळकावणारे भारतीय फलंदाज
सरफराज खान- 0 आणि 150 (वि न्यूझीलंड, 2024)
सचिन तेंडुलकर- 0 आणि 136 (वि. पाकिस्तान, 1999)
शुभमन गिल- 0 आणि 119 (वि बांग्लादेश, 2024)
सुनील गावस्कर- 0 आणि 118 (वि. ऑस्ट्रेलिया, 1977)
शिखर धवन- 0 आणि 114 (वि न्यूझीलंड, 2014)
मोहम्मद अझरुद्दीन- 0 आणि 109 (वि. पाकिस्तान, 1989)
विराट कोहली- 0 आणि 104 (वि श्रीलंका, 2017)
दिलीप वेंगसरकर- 0 आणि 103 (वि. इंग्लंड, 1979)
बंगळुरू कसोटीत सरफराजने आधी विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर ऋषभ पंतसोबत चौथ्या विकेटसाठी 177 धावांची भागीदारी केली.
सरफराज आणि पंत यांच्या खेळीने भारताला न्यूझीलंडवर आघाडी घेण्यास मदत केली आहे. एकवेळ भारतीय संघ न्यूझीलंडच्या 356 धावांनी पुढे होता. पण कोहलीच्या 70 आणि सरफराजच्या ऐतिहासिक खेळीमुळे भारताला आता न्यूझीलंडविरुद्ध आघाडी मिळाली आहे. सरफराज 150 धावांच्या ऐतिहासिक खेळीत 18 चौकार आणि तीन षटकार ठोकले. सर्फराजला टीम साऊदीने बाद केले.
हे ही वाचा -