Salvador Stampede : फुटबॉलचा सामना अचानक थांबवला अन्... भयंकर चेंगराचेंगरी; 12 जणांचा मृत्यू, 500 जण जखमी
Football Stampede At least 12 Dead : साल्वाडोरमधील एका फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी होऊन 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे 500 प्रेक्षक जखमी झाले आहेत.
Stampede in Football Stadium : मध्य अमेरिकन देश साल्वाडोरमधील (Salvador Stampede) एका फुटबॉल (Football) सामन्यादरम्यान भीषण अपघात घडला. फुटबॉल सामन्यादरम्यान (Football Stampede) भयंकर चेंगराचेंगरी झाल्याने 12 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 प्रेक्षक जखमी झाले आहेत. अवघ्या 16 मिनिटे चाललेला सामना एका भीषण अपघातात बदलला. साल्वाडोरमध्ये एका देशांतर्गत सामन्यादरम्यान ही घटना घडली. या अपघातात सुमारे 12 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. त्याचवेळी 500 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
साल्वाडोरमध्ये फुटबॉल सामन्यात चेंगराचेंगरी
एल साल्वाडोरमध्ये झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. एका फुटबॉल सामन्यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, यामध्ये 12 जणांना आपला जीव गमवावा लागला. एल साल्वाडोरच्या राष्ट्रीय नागरी पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी चेंगराचेंगरी झाली.
चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू, 500 जण जखमी
साल्वाडोरच्या राजधानीपासून 25 मैल ईशान्येस असलेल्या मोन्युमेंटल स्टेडियममध्ये ही दुर्घटना घडली आहे. या स्टेडियममध्ये देशांतर्गत उपांत्यपूर्व सामना खेळवला जाणार होता. अलियान्झा क्लब आणि एफएएस क्लब यांच्यात सामना रंगला. या स्टेडियमची क्षमता 44836 प्रेक्षकांची होती, पण सामना पाहण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक स्टेडियममध्ये दाखल झाले. यामुळे ही दुर्घटना घडली.
गर्दीमुळे आयोजकांनी थांबवला सामना
फुटबॉल सामना सुरू झाल्यानंतर 16 मिनिटांनी हा अपघात झाला, त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. साल्वाडोराचे आरोग्य मंत्री फ्रान्सिस्को अल्बी यांनी सांगितलं की, स्टेडियमच्या बाहेर आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सामना सुरू झाल्यानंतर 16 मिनिटांनी स्थगित
प्रेक्षकांची संख्या इतकी जास्त होती की त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याचा गोंधळ सुरू झाल्यानंतर अवघ्या 16 मिनिटांनी सामना स्थगित करण्यात आला. स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी सुरू झाली. लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. स्टेडिअमवर चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,, अपघातात जखमी झालेल्या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शहरातील सर्व रुग्णालयांतून आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे. तर, सुमारे 500 लोक जखमी आहेत.