निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Elephant Video : निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video

Elephant Video : हत्ती हा जगातील सर्वात शक्तिशाली प्राण्यांपैकी एक मानला जातो. लोकांवर सोंडेने प्रेम व्यक्त करणारे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हत्ती जेवढं प्रेम व्यक्त करताना दिसतो, मात्र, हत्ती संतापलेला असल्यानंतर त्याला नियंत्रणात आणणे सोपे नसते. हत्तीला राग अनावर झाल्यावर तो हल्ला करुन होत्याचं नव्हतं करु शकतो. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत काही लोकांनी संतापजनक प्रकार केलाय. अगोदर हत्तीने हल्ला करावा, यासाठी त्याला उकसवण्यात आलं. त्यानंतर हत्ती हल्ला करु लागल्यानंतर त्याच्या डोक्यात जेसीबी घालण्यात आलाय. संतापलेल्या हत्तीने जेसीबी उचलला होता. मात्र, जेसीबी डोक्यात घातल्यानंतर तो तिथून निघून गेलाय. जेसीबी चालकाचे नशीब बलवत्तर म्हणून तो यात बचावला आहे.
लोकांनी हत्तीला हल्ला करण्यासाठी उसकवलं
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, लोक एका मोकळ्या मैदानात हत्तीला उकसवण्याच प्रयत्न करत आहेत. लोक आधी ओरडतात आणि हत्तीला हल्ला करण्यासाठी चिथवतात. मग संतापलेला हत्ती देखील हल्ला करु लागतो. तेव्हा लोक जेसीबीने त्याच्यावर हल्ला करता. बुलडोझर चालक आणि जमाव मोकळ्या मैदानात आनंद लुटत असलेल्या हत्तीला अशा प्रकारे भडकवतात की हत्तीचा संतापलेल्या स्थितीत जातो.
हत्तीने रागाने बुलडोझर ढकलताच तेथे उभे असलेले लोक हत्तीच्या मागे धावताना दिसत आहेत. त्यानंतर हत्ती ओरडत तिथून निघून जाताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानंतर सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























