Yashasvi Jaiswal Duck : पिंक बॉल कसोटीत भारताचे 2 सलामीवीर शून्यावर आऊट, एकाचं करिअरही संपलं
Australia vs India 2nd Test : सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा थरार सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे.
Australia vs India 2nd Test : सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा थरार सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाने डे-नाईट कसोटी सामना खेळण्याची ही पाचवी वेळ आहे. टीम इंडियाने यापूर्वी खेळल्या गेलेल्या 4 डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आणि मेन इन ब्लू तीन सामने जिंकण्यात यशस्वी ठरले. त्याचबरोबर या काळात अनेक फलंदाजांनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर आपली छाप सोडण्यात यश मिळवले आहे.
त्याच वेळी, असे काही फलंदाज होते ज्यांची बॅट डे-ना कसोटी सामन्यात पूर्णपणे शांत दिसत होती. भारताचा स्टार खेळाडू यशस्वी जैस्वाल पिंक बॉल कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. आत्तापर्यंत टीम इंडियाचे सलामीवीर दोन सलामीवीर फलंदाज शून्यावर बाद डे-ना कसोटी शून्यावर बाद झाले आहे. त्यापैकी एकाचे तर करिअर जवळपास संपलं आहे.
यशस्वी जैस्वालने फार कमी वेळात आपल्या दमदार कामगिरीने भारताच्या कसोटी संघात आपले स्थान पक्के केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने पर्थ कसोटीत शतक झळकावून निवडकर्त्यांचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. मात्र, ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या डे-नाईट कसोटीत त्याला आपला फॉर्म कायम ठेवता आला नाही. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मिचेल स्टार्कने त्याची शिकार केली. अशाप्रकारे जैस्वाल हा दिवस-रात्र कसोटीत शून्यावर बाद होणारा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला.
GOLDEN DUCK FOR YASHASVI JAISWAL. pic.twitter.com/om7YoMcNtO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 6, 2024
याआधी बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेला पृथ्वी शॉ शून्यावर आऊट झाला होता. 2018 मध्ये टीम इंडियाने ॲडलेडमध्ये पहिली डे-नाईट टेस्ट खेळली, तेव्हा शॉ देखील प्लेइंग 11 चा भाग होता. मात्र संधीचा फायदा घेण्यात तो फेल ठरला. भारताच्या पहिल्या डावात शॉ शून्यावर बाद झाला. त्याला मिचेल स्टार्कने बोल्ड केले होते. सामन्याच्या दुसऱ्या डावातही शॉची बॅट शांत राहिली आणि त्याला केवळ 4 धावाच करता आल्या. हा सामना 8 विकेटने जिंकण्यात ऑस्ट्रेलियन संघाला यश आले.
हे ही वाचा -