Ind vs Aus Pink Ball Test : पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे.
Mitchell Starc dismisses Yashasvi Jaiswal on first ball : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळला जात आहे. पिंक बॉल कसोटीत टीम इंडियाची खडतर परीक्षा असणार आहे, कारण याआधी जेव्हा भारतीय संघ या मैदानावर डे-नाईट कसोटी खेळण्यासाठी आला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताला 36 धावांवर ऑलआऊट केले होते. रोहित शर्मा आणि कंपनी कांगारूंकडून बदला घेण्यासाठी आतुर असेल.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने पुनरागमन केले आहे. नाणेफेकीदरम्यान त्याने मधल्या फळीत फलंदाजी करणार असल्याचे सांगितले. म्हणजे केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आले.
पण ॲडलेड कसोटीत पहिल्याच चेंडूवर जे घडले त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. भारताच्या पहिल्या डावातील पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वाल आऊट झाला. मिचेल स्टार्कने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टार्कचा चेंडू त्याच्या पॅडला लागला जो लेगस्टंपवर जात होता. डीआरएससाठी नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या राहुलशी तो बोलला, पण राहुलने डीआरएस घेण्यास नकार दिला. अशा प्रकारे पहिल्याच चेंडूवर भारताला मोठा धक्का बसला.
FIRST BALL OF THE TEST!
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2024
Mitchell Starc sends Adelaide into delirium.#AUSvIND | #PlayOfTheDay | @nrmainsurance pic.twitter.com/pIPwqlX3dJ
आधी पर्थ, आता ॲडलेड… पहिल्या डावात शून्यावर बाद
पहिल्या चेंडूवर बाद झाल्यामुळे यशस्वी जैस्वालला ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. याआधी पर्थ कसोटीच्या पहिल्या डावातही तो खाते न उघडता बाद झाला होता. मिचेल स्टार्कने दोन्ही सामन्यांच्या पहिल्या डावात त्याला शून्यावर बाद केले. यशस्वीने गेल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले होते. सध्या शुभमन गिल आणि केएल राहुल क्रीजवर आहेत. गिलनेही ओव्हरच्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर दोन चौकार मारले.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया संघ : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (क), नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
हे ही वाचा -