Womens Asia Cup 2022: भारताचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
Womens Asia Cup 2022: महिला आशिया चषकातील पाचव्या सामन्यात भारतीय महिला संघ आणि बांग्लादेश महिला संघात (India Women vs Bangladesh Women) आज आमने-सामने येणार आहेत.
Womens Asia Cup 2022: महिला आशिया चषकातील पाचव्या सामन्यात भारतीय महिला संघ आणि बांग्लादेश महिला संघात (India Women vs Bangladesh Women) आज आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांमधील हा सामना शेल्हेटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium) खेळवला जातोय. भारतीय संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आजचा सामना खेळत नसून तिच्या जागी स्मृती मानधना (Smriti Mandhana) संघाचं नेतृत्व करणार आहे.
भारतीय महिला संघाला गेल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानला 137 धावांवर रोखल्यानंतरही भारतीय संघ 124 धावांवर ऑलआऊट झाला होता. महिला आशिया चषक स्पर्धेतील या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान भारताच्या जवळ पोहोचला आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपला पाचवा सामना बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थान पक्क करण्यासाठी आणि उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकतील.
भारतासमोर बांग्लादेशचं कडवं आव्हान
महिला आशिया चषक स्पर्धेत बांगलादेश भारतासाठी मोठा धोका आहे. कारण याच संघानं गेल्या वेळी भारताला अंतिम फेरीत पराभूत करून भारताच्या पदरात निराशा टाकली होती. एवढेच नाही तर, ग्रुप स्टेजमध्ये भारताला हरवणारा बांगलादेश हा एकमेव संघ होता. 2018 पूर्वी महिला आशिया चषकाच्या 6 आवृत्त्या खेळल्या गेल्या आणि प्रत्येक वेळी भारतानंच विजेतेपद पटकावलं. परंतु, मागील आवृत्तीत बांगलादेशनं भारताचा विजयी रथ रोखून पहिल्यांदाच आशिया चषकावर नाव कोरलं.
भारताची प्लेइंग इलेव्हन:
स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, सभिनेनी मेघना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकिपर), किरण नवगिरे, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रेणुका सिंह, राजेश्वरी गायकवाड.
बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन:
मुर्शिदा खातून, फरगाना होक, निगार सुलताना (कर्णधार/विकेटकिपर), रितू मोनी, लता मोंडल, फहिमा खातून, रुमाना अहमद, नाहिदा अक्टर, सलमा खातून, फरीहा त्रिस्ना, शांजिदा अक्टर.
हे देखील वाचा-