एक्स्प्लोर

'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत

Boat Capsized Near Morocco : दरवर्षी लाखो पाकिस्तानी चांगल्या जीवनाच्या शोधात युरोपात स्थलांतरित होतात. यापैकी बहुतेक लोक बेकायदेशीर पद्धती म्हणजेच डंकी मार्गाचा अवलंब करतात.

Boat Capsized Near Morocco : किंग खान शाहरुखच्या डंकी चित्रपटाने अवैधरित्या युरोप अमेरिकेत घुसखोरी करणााऱ्यांची अवस्था दाखवून दिली होती. हा मार्ग किती खडतर आहे याचाही अंदाज दिला होता. आता तसाच प्रकार पाकिस्तानींच्या बाबतीत घडला आहे. बेकायदेशीरपणे युरोपला जाणारे 44 पाकिस्तानी नागरिक अटलांटिक महासागरात बुडाले. पाकिस्तानी वेबसाइट डॉनने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकेतून स्पेनला जाणारी एक बोट मोरोक्कोमधील डाखला बंदराजवळ बुडाली.

बोटीवर 80 हून अधिक लोक 

बोटीवर 80 हून अधिक लोक होते. यामध्ये 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यात बहुतांश पाकिस्तानी आहेत. वृत्तानुसार, प्रवासादरम्यान लोकांना घेऊन जाणारे जहाज बेपत्ता झाले होते. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सापडले नाही. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला असून मानवी तस्करी रोखण्यासाठी पावले उचलण्याबाबत बोलले आहे. दरम्यान, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अधिकाऱ्यांकडून घटनेचा अहवाल मागितला आणि मानवी तस्करीच्या घृणास्पद कृत्यामध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.

एक दिवसापूर्वी बोट बुडाल्याने 36 जणांना वाचवण्यात यश 

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मोरोक्कोमधील दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "रबत (मोरोक्को) मधील आमच्या दूतावासाने आम्हाला कळवले आहे की मॉरिटानियाहून निघालेल्या अनेक पाकिस्तानी नागरिकांसह 80 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट मोरोक्कोच्या डाखला बंदराजवळ उलटली आहे." पाकिस्तानींसह अनेक वाचलेले दखलाजवळच्या छावणीत मुक्कामी आहेत. बोट उलटण्याच्या घटनेच्या एक दिवस आधी असाच अपघात घडला होता. मोरक्कनच्या अधिकाऱ्यांनी एका दिवसापूर्वीच एका बोटीतून 36 जणांची सुटका केली होती. ही बोट 2 जानेवारी रोजी 86 प्रवासी घेऊन मॉरिशसहून निघाली होती. या स्थलांतरितांमध्ये 66 पाकिस्तानींचाही समावेश आहे. वॉकिंग बॉर्डर्सच्या सीईओने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की बुडालेल्यांपैकी 44 लोक पाकिस्तानचे आहेत.

2024 मध्ये युरोपला जाताना 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू  

दरवर्षी लाखो पाकिस्तानी चांगल्या जीवनाच्या शोधात युरोपात स्थलांतरित होतात. यापैकी बहुतेक लोक बेकायदेशीर पद्धती म्हणजेच डंकी मार्गाचा अवलंब करतात. स्थलांतरितांवर काम करणाऱ्या Frontex एजन्सीनुसार, गेल्या वर्षी 2.4 लाखांहून अधिक लोक कोणत्याही कागदपत्रांशिवाय युरोपमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाले. वॉकिंग बॉर्डर्स या दुसऱ्या एजन्सीने सांगितले की 2024 पर्यंत स्पेनमध्ये पोहोचण्याच्या प्रयत्नात 10,457 लोकांचा मृत्यू  झाला. मॉरिटानिया आणि सेनेगल सारख्या पश्चिम आफ्रिकन देशांमधून स्पेनच्या कॅनरी बेटांवर प्रवास करताना त्यापैकी बहुतेकांचा मृत्यू झाला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकर पोलिसांच्या जाळ्यात अडकला, आज कोर्टात सुनावणीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 25 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 25 march 2025ABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 25 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hit and Run Motor Accident :  हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
 हृदयद्रावक! मेहुणीच्या लग्नाकरिता आलेल्या जावयावर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत घटनास्थळीचं मृत्यू 
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Embed widget