ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics
सैफ अली खान हल्लाप्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश, ओळख पटलेला संशयितच हल्लेखोर असण्याची दाट शक्यता, मात्र संशयित अजून पोलिसांच्या ताब्यात नाही
करीना कपूरचा जबाब माझाकडे एक्स्लुझिव्ह, हाणामारीवेळी हल्लेखोर प्रचंड आक्रमक, करीनाचा जबाब, समोर असलेल्या दागिन्यांना हातही न लावल्याचं स्पष्ट
सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी दादरमध्ये गेल्याची माहिती, आधी मोबाईल दुकानात हेडफोनची खरेदी, त्यानंतर मार्केटमध्ये फेरफटका मारल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंकडून जाहीर, सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रतेची छाननी सुरु असल्याचीही माहिती
छगन भुजबळांची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला दोन तास उपस्थिती, पटेल आणि तटकरेंनी विनंती केल्याने हजेरी, अधिवेशनाला आलो म्हणजे नाराजी दूर झाली असं नाही, भुजबळांची स्पष्टोक्ती
दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख, शिष्यवृत्तीच्या सोयीसाठी जात प्रवर्ग, शिक्षणतज्ज्ञांकडून टीका होताच बोर्डाचं स्पष्टीकरण
एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं, अनेक महिन्यांपासून प्रलंबित ८७ जात प्रमाणपत्रांना अवघ्या तासात मंजुरी, पारधी समाजातील विद्यार्थ्यांचं वास्तव एबीपीने केलं होतं उघड