Pro Kabaddi League 2022: यूपी योद्धानं जयपूर पँथर्सच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; राहुल चौधरीचा फ्लॉप शो
Pro Kabaddi League 2022: प्रो कबड्डी लीग 2022 च्या तिसऱ्या सामन्यात सामन्यात यूपी योद्धानं (UP Yoddha) जयपूर पिंक पॅंथर्सचा (Jaipur Pink Panthers) 34-32 नं पराभव केला.
Pro Kabaddi League 2022: प्रो कबड्डी लीग 2022 च्या तिसऱ्या सामन्यात सामन्यात यूपी योद्धानं (UP Yoddha) जयपूर पिंक पॅंथर्सचा (Jaipur Pink Panthers) 34-32 नं पराभव केला. सामना सुरुवातीपासून शेवटपर्यंत रोमांचक ठरला. अखेरच्या रेडमध्ये या सामन्याचा निकाल लागला. दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. मात्र, सामन्याच्या अखेरिस यूपी योद्धाचं पारडं जड राहिलं.
ट्वीट-
The Yoddhas sneaked past the Panthers in an absolute nail-biter 🎬#vivoProKabaddi fans, 𝘩𝘰𝘸'𝘴 𝘵𝘩𝘢𝘵 𝘧𝘰𝘳 𝘢 #𝘍𝘢𝘯𝘵𝘢𝘴𝘵𝘪𝘤𝘗𝘢𝘯𝘨𝘢?#JPPvUP pic.twitter.com/DBgfV8wTxJ
— ProKabaddi (@ProKabaddi) October 7, 2022
प्रदीप नरवालची निराशाजनक कामगिरी
सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघ बरोबरीत होते. मात्र, 10 मिनिटांनंतर जयपूरनं पँथर्सनं दमदार खेळ दाखवत यूपी योद्धांना ऑल आऊट करत पाच गुणांची आघाडी घेतली. पहिल्या हाफच्या अखेरिस जयपूर 15-12 नं पुढं होता. प्रो कबड्डीच्या मागच्या हंगामात धुमाकूळ घालणारा रेडन प्रदीप नरवाल पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरला. त्याला या सामन्यात एकही गुण घेता आला नाही. सुरेंदर गिलनं चार, तर जयपूरसाठी अर्जुन देशवालने चार गुण घेतले.
दोन्ही संघाची एकमेकांना कडवी झुंज
दुसऱ्या हाफमध्ये तीन मिनिटांचा खेळ झाला. यूपी योद्धानं जयपूरला ऑलआऊट करून सामन्यात 18-16 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफच्या नवव्या मिनिटाला अजित कुमारने डू ऑर डाई रेडमध्ये जाऊन जाऊन तीन गुण घेत 21-20 असा स्कोअर केला. अजितच्या या रेडनंतरही जयपूर एका गुणानं मागं होता. यानंतर भवानी राजपूतनंही सुपर रेड टाकली. सामना संपण्याच्या चार मिनिटे आधी यूपी ऑलआऊट झाला होता आणि जयपूर फक्त एक गुणानं मागं होता. यानंतर यूपीनं दोन गुणांची आघाडी घेत सामना जिंकला.
राहुल चौधरीची फ्लॉप शो
पहिल्या हाफमध्ये एकही गुण घेऊ न शकलेल्या प्रदीप नरवालनं दुसऱ्या हाफमध्ये सात गुण जमा केले. यूपीसाठी सुरेंदर गिलनं सर्वाधिक आठ रेड पॉइंट घेतले. अर्जुन देसवालनंही जयपूरसाठी आठ रेड पॉइंट घेतले. राहुल चौधरीला सामन्यात केवळ एकच गुण घेता आला.
हे देखील वाचा-