Video: पाकिस्तानच्या यासिर शाहची शेन वार्नशी तुलना, श्रीलंकेविरुद्ध टाकला 'बॉल ऑफ द सेंचुरी', पाहा व्हिडिओ
Ball of the Century: श्रीलंका आणि पाकिस्तान (SL VS PAK) यांच्यात गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Galle International Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जातोय.
Ball of the Century: श्रीलंका आणि पाकिस्तान (SL VS PAK) यांच्यात गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Galle International Stadium) पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या गोलंदाज यासिर शाह (Yasir Shah) श्रीलंकेचा टॉप ऑर्डरचा फलंदाज कुसल मेंडिसला (Kusal Mendis)आश्चर्यचकीत केलं. ज्यामुळं त्याची तुलना ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वार्नच्या (Shane Warne) 'बॉल ऑफ द सेंचुरी'शी (Ball of the Century) तुलना केली जातेय. यसीरच्या गोलंदाजीवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. दरम्यान, 1993 मध्ये शेन वार्ननं ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर फेकलेला चेंडूला 'बॉल ऑफ द' सेंचुरी असं संबोधलं जातं.
यासिर शाह हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा पार्ट टाईम गोलंदाज आहे. परंतु, ज्यावेळी त्याला पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यानं उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. यासिर शाहनं पाकिस्तानसाठी 17 कसोटी सामन्यांमध्ये 100 विकेट्स पूर्ण केले आहेत. दरम्यान, गाले येथे सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत यासिर शाहनं कुसल मेंडिसला टाकलेल्या चेंडूनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात यासिरनं कुशल मेंडिसला टाकलेल्या चेंडूनं शेन वार्नच्या 'बॉल ऑफ द सेंच्युरी'च्या आठवणी ताज्या झाल्या. यासिर शाहनं मेंडिसला लेग-स्टंपच्या बाहेर टाकला. परंतु, चेंडूनं मोठा टर्न घेतला आणि मेंडिसचा ऑफ-स्टंप उडला.
व्हिडिओ-
पाकिस्तानसमोर विजयासाठी 342 धावांचं लक्ष्य
यासिनं आतापर्यंत श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं आहे.या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा संघ 222 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला 218 धावा करता आल्या. श्रीलंकेच्या संघानं दुसऱ्या डावात चार धावांच्या आघाडीसह 341 धावापर्यंत मजल मारली. या सामन्यात पाकिस्ताच्या संघाला विजयासाठी 342 धावांचं लक्ष्य मिळालं आहे.
हे देखील वाचा-
- KL Rahul Vs Jhulan Goswami: नेटमध्ये झुलन गोस्वामीची केएल राहुलसमोर घातक गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
- Zlatan Ibrahimovic: एज डजन्ट मॅटर! वयाच्या 41व्या वर्षानंतरही स्टार खेळाडू ज्लाटान इब्राहिमोविचस खेळणार फुटबॉल
- Commonwealth Games 2022: विश्वचषकात महिला हॉकी संघाचं खराब प्रदर्शन, कॉमनवेल्थ गेम्समध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा