Punjab Kings List Captain : 17 हंगाम... 17 कॅप्टन! कपड्यांसारखे प्रीती झिंटाच्या टीमने बदलले कर्णधार, युवराजपासून ते श्रेयस अय्यरपर्यंत, पाहा लिस्ट
पंजाब किंग्ज संघ 2008 पासून आयपीएलमध्ये सहभागी होत आहे, परंतु संघाला एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही.
Punjab Kings Announced Shreyas Iyer Captain : पंजाब किंग्ज संघ 2008 पासून आयपीएलमध्ये सहभागी होत आहे, परंतु संघाला एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. आयपीएल 2025 हंगाम सुरू होण्याच्या दोन महिने आधी, पंजाब किंग्जने त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. यावेळी, बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या टीमने अनोख्या पद्धतीने आपल्या कॅप्टनची घोषणा केली. रविवारी पंजाब किंग्जचे तीन स्टार खेळाडू श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल आणि शशांक सिंग 'बिग बॉस' शोमध्ये पोहोचले. जेथे सलमान खानने स्टेजवरून घोषणा केली की श्रेयस अय्यर आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार असेल.
आयपीएल 2025 च्या आधी झालेल्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरवर पाण्यासारखे पैसे खर्च केले आणि त्याला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. 17 वर्षांपासून ट्रॉफीसाठी आसुसलेल्या प्रीती झिंटाच्या संघाने आता हा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी अय्यरवर सोपवली आहे. गेल्या वर्षी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल चॅम्पियन बनले होते. हा स्टार फलंदाज पंजाब किंग्जचे नशीब बदलण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.
𝐒𝐡𝐞𝐫 𝐧𝐚𝐡𝐢, 𝐛𝐚𝐛𝐛𝐚𝐫 𝐒𝐇𝐑𝐄 𝐚𝐚! 🦁🔥#SherSquad, how excited are you to see Shreyas Iyer as our captain? ©️#ShreyasIyer #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/Y7u266jCOU
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 12, 2025
श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा नवा कर्णधार
पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर खूप आनंदी दिसत होता. फ्रँचायझीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ जारी केला आहे आणि या प्रवासासाठी त्याचे अभिनंदन केले आहे.
पंजाब किंग्जने कपड्यांसारखे बदलले कर्णधार
आयपीएल ट्रॉफीच्या शोधात गेल्या 17 वर्षांत पंजाब किंग्जने आतापर्यंत एकूण 17 कर्णधार बदलले आहेत. 2008 मध्ये झालेल्या पहिल्या आवृत्तीत युवराज सिंगने संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी हा संघ किंग्ज इलेव्हन पंजाब म्हणून ओळखला जात होता. तेव्हापासून फ्रँचायझी जवळजवळ दरवर्षी कर्णधार बदलत राहिली, परंतु संघाचे नशीब बदलू शकले नाही.
𝘞𝘪𝘵𝘩 𝘨𝘳𝘦𝘢𝘵 𝘱𝘰𝘸𝘦𝘳 𝘤𝘰𝘮𝘦𝘴 𝘨𝘳𝘦𝘢𝘵 𝘳𝘦𝘴𝘱𝘰𝘯𝘴𝘪𝘣𝘪𝘭𝘪𝘵𝘺! 💫#CaptainShreyas #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/jCYtx4bbVH
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 12, 2025
पंजाब किंग्जच्या कर्णधारांची संपूर्ण यादी....
युवराज सिंग – 2008-09
कुमार संगकारा – 2010
महेला जयवर्धने – 2010
अॅडम गिलख्रिस्ट – 2011-13
डेव्हिड हसी – 2012-13
जॉर्ज बेली - 2014-15
वीरेंद्र सेहवाग – 2015
डेव्हिड मिलर – 2016
मुरली विजय – 2016
ग्लेन मॅक्सवेल – 2017
रविचंद्रन अश्विन – 2018-19
केएल राहुल – 2020-21
मयंक अग्रवाल – 2021-22
शिखर धवन – 2022-24
सॅम करन – 2023-24
जितेश शर्मा – 2024
श्रेयस अय्यर – 2025
23 मार्चपासून सुरू होणार आयपीएल 2025चा थरार
इंडियन प्रीमियर लीग 2025 मार्चमध्ये सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रविवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आयपीएल 2025 23 मार्चपासून सुरू होईल. हा आयपीएलचा 18 वा हंगाम असणार आहे.
हे ही वाचा -