Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट... रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला 'नवा' अश्विन!
Tanush Kotian Profile : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात मुंबईनं रणजी चषकाच्या (Mumbai ranji trophy) अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईनं रेकॉर्डब्रेक 48 व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केलाय.
Tanush Kotian Profile : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात मुंबईनं रणजी चषकाच्या (Mumbai ranji trophy) अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईनं रेकॉर्डब्रेक 48 व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केलाय. अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईनं तामिळनाडूचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान पक्कं केलं. मुंबईला अंतिम फेरीत पोहचवण्यात युवा खेळाडूचं मोठं योगदान राहिलाय. होय, युवा तनुश कोटियन (Tanush Kotian) यानं अष्टपैलू कामगिरी करत मुंबईला अंतिम फेरीत पोहचवण्यात सिंहाचा वाटा उचललाय.
रणजी स्पर्धेत मुंबकडून खेळणाऱ्या तनुश कोटियन यानं सर्वांचं मनं जिंकली. युवा अष्टपैलू तनुष याची तुलना अश्विन आणि रवींद्र जाडेजा याच्यासोबत केली जात आहे. भारताला नवा अश्विन मिळणार, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. रणजी स्पर्धेत तनुश यानं गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये मोठं योगदान दिलेय. तनुष कोटियान ऑफ स्पिन गोलंदाजी करण्यासोबत फलंदाजी करण्यातही सक्षम आहे. रणजी सामन्यात कोटियान यानं दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता सेमीफायनलमध्ये दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत कोटियान यानं 89 धावांची खेळी केली. कोटियान याची कामगिरी पाहता अनेकांना अश्विनची आठवण आली. रवीचंद्र अश्विन यानं गोलंदाजीसोबत अनेकदा तळाला फलंदाजी करताना फलंदाजीमध्ये मोठं योगदान दिलेय. अश्विनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाची नोंद आहे. त्यानं कठीण स्थितीमध्ये अनेकदा डाव सावरलाय. कोटियन यानं मुंबई अडचणीत असताना तळाला शतक ठोकत डाव सावरलाय. त्यामुळे त्याची तुलना दिग्गजांसोबत केली जातेय.
रणजी ट्रॉफीमध्ये तनुश कोटियनचा जलवा -
यंदाच्या रणजी स्पर्धेत तनुश कोटियन यानं गोलंदाजी आणि फलंदाजीत मोठं योगदान दिलेय. तळाला फलंदाजी करताना त्यानं महत्वाच्या खेळी केल्या आहेत. त्याशिवाय गोलंदाजीतही त्यानं आपला जलवा दाखवलाय. यंदाच्या हंगामात तनुष कोटियन यानं 9 सामन्यात 48 च्या सरासरीने 481 धावा जमावल्या आहेत. तळाला फलंदाजी करताना 481 धावा करणं मोठी बाब आहे. महत्वाचं म्हणजे, त्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात तो मुंबईकडून दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय 9 सामन्यात त्यानं 22 विकेट घेतल्या आहेत. तनुश यानं अनेकदा महत्वाच्या वेळी शानदार खेळी केली आहे. भविष्यात टीम इंडियात तो अश्विनची जागा घेऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे. अश्विन सध्या 36 वर्षांचा आहे, त्यामुळे त्याच्या निवृत्तीनंतर तनुष कोटियान याला संधी मिळू शकते.
लिलावात राहिला अनसोल्ड -
रणजी स्पर्धेत अष्टपैलू खेळीनं सर्वांचं मनं जिंकणारा तनुष कोटियन नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला होता. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्यानं मुंबईसाठी महत्वाचं योगदाज दिलेय. मुंबईकडून धावा करण्यात दुसरा तर विकेट घेण्यात तिसरा खेळाडू आहे. प्रतिभावंत तनुषला आयपीएल लिलावात खरेदीदार मिळाला नाही. तो अनसोल्ड राहिला होता. गोलंदाजी अॅक्शनमुळे आयपीएल संघाने त्याच्यावर डाव खेळला नाही, असे म्हटले जातेय. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या तनुषची तुलना दिग्गज क्रिकेटरसोबत होतेय.
आणखी वाचा :
IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हैदराबादचा मोठा डाव, विश्वविजेत्याला केले कर्णधार