(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हैदराबादचा मोठा डाव, विश्वविजेत्याला केले कर्णधार
SRH Captain For IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला (IPL 2024) अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलाय. त्याआधीच सनरायजर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) संघाने मोठा निर्णय घेतला आहे.
SRH Captain For IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला (IPL 2024) अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलाय. त्याआधीच सनरायजर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) संघाने मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून (World cup 2023) देणाऱ्या पॅट कमिन्सला (Pat Cummins) हैदराबादनं कर्णधार केले आहे. सोमवारी हैदराबाद संघाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. आयपीएल 24 आधी झालेल्या मिनी लिलावात हैदराबादनं पॅट कमिन्सला (Pat Cummins) 20.50 लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएलच्या इतिहासात दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. आता त्याच्याकडे हैदराबाद संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. एडन मार्करम याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आलेय.
20.50 कोटी रुपयांत खेरेदी केल्यानंतर आता हैदराबादनं पॅट कमिन्सलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. 22 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएल 2024 साठी कमिन्सला कर्णधार केलेय. सोशल मीडियावर हैदराबाद संघाने याबाबतची माहिती दिली. "पॅट कमिन्स आमचा नवा कर्णधार" असं ट्वीट हैदराबाद संघानं केलेय.
आयपीएल 2023 मध्ये हैदराबादची कामगिरी -
एडन मार्करम याच्या नैतृत्वात हैदाराबद आयपीएल 2023 चा हंगामात उतरले होते. हैदराबादची कामगिरी अतिशय खराब राहिली होती. मार्करमच्या नेतृत्वात हैदराबाद संघाला 14 पैकी फक्त चार सामन्यात विजय मिळवता आळा होता. गुणतालिकात हैदराबादचा संघ दहाव्या स्थानावर राहिला होता.मागील हंगामात अतिशय खराब कामगिरी केल्यानंतर टीम मॅनेजमेंटनं कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतलाय. पॅट कमिन्स जगातील यशस्वी कर्णधारापैकी एक आहे. कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने वनडे विश्वचषकावर नाव कोरले होते. त्याशिवाय कसोटी अजिंक्यपद स्पर्धाही जिंकली होती. त्यामुळे आता कमिन्सकडे नेतृत्व सोपवत हैदराबादनं आयपीएल 2024 साठी नवी रणनिती आखली आहे. कमिन्सच्या नेतृत्वात हैदराबातचा संघ कशी कामगिरी करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
#OrangeArmy! Our new skipper Pat Cummins 🧡#IPL2024 pic.twitter.com/ODNY9pdlEf
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 4, 2024
पॅट कमिन्सचं टी 20 मधील प्रदर्शन -
पॅट कमिन्सचा टी 20 रेकॉर्ड शानदार राहिलाय. त्यानं आतापर्यंत 130 टी 20 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्यानं 721 धावा चोपल्या आहेत. कमिन्सच्या नावावर ती अर्धशतकेही आहे. त्याची सर्वोच्च झधावसंख्या 66 इतकी आहे. गोलंदाजीत कमिन्सचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. त्यानं 145 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. कमिन्स यानं आयपीएलचे 42 सामने खेळले आहेत. यामध्ये 379 धावा आणि 45 विकेट घेतल्या आहेत.
Pat Cummins in the last 9 months:
— Roushan Kumar Bharti (@RoushanKrBharti) March 4, 2024
- Won WTC.
- Retained the Ashes.
- Won the World Cup.
- 20.25cr in IPL auction.
- POTM in Boxing Day Test.
- ICC Player of the Month.
- Cricketer of the Year.
- ICC Test Team's captain.
- Appointed as SRH captain.#PatCimmins #SRH #SRHCaptain pic.twitter.com/E9w9m0Yc7U