Uday Samant Nagpur:छगन भुजबळांबाबत अजितदादा निर्णय घेणार, शिवसेनेच्या नाराज आमदारांबाबत काय म्हणाले?
Uday Samant Nagpur:छगन भुजबळांबाबत अजितदादा निर्णय घेणार, शिवसेनेच्या नाराज आमदारांबाबत काय म्हणाले?
'वन नेशन, वन इलेक्शन' (One Nation One Election Bill) संबंधित विधेयक 17 डिसेंबर म्हणजेच, आज लोकसभेत मांडलं जाणार आहे. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) हे विधेयक लोकसभेत मांडणार आहेत. याला संविधान (129वी दुरुस्ती) विधेयक 2024 असं संबोधलं जात आहे. दुसरीकडे, भाजपनं आपल्या सर्व लोकसभा खासदारांना 17 डिसेंबर 2024 रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात महत्त्वाच्या कायदेविषयक कामांवर चर्चा होणार असल्याचं पक्षानं म्हटलं आहे.
मोदी कॅबिनेटनं दोन विधेयकांना मंजुरी दिली आहे. एक घटना दुरुस्ती विधेयक आहे, जे लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी सादर केलं जाईल. दुसरं एक समान विधेयक आहे, जे दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकसभा आणि इतर राज्यांसह विधानसभा निवडणुका घेण्यासाठी सादर केले जाईल. मात्र, या अधिवेशनात विधेयक मंजूर होणं अपेक्षित नाही. ही विधेयकं सभागृहात सादर होताच, ती संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) पाठवली जातील अशी अपेक्षा आहे.