एक्स्प्लोर

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने छगन भुजबळ नाराज असून मनोज जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं, असं त्यांनी म्हटलं होतं.

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाल्याचे आहेत. जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं, असे छगन भुजबळांनी म्हटले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केलाय.

संजय राऊत म्हणाले की, महायुतीकडे  225 च्या जवळपास आकडा आहे. त्यांच्याकडे मोठे बहुमत आहे. त्यामुळे कोणाचा असंतोष बाहेर आला तरी सरकारला चटके बसतील, अशी शक्यता नाही. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत.  मधल्या काळात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळ यांनी टोकाची भूमिका घेतली. आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता. कारण दोन्ही समाज महाराष्ट्रातील प्रमुख सामाजिक घटक आहेत. सगळ्यांना न्याय मिळावा ही आमच्या सगळ्यांची भूमिका असताना भुजबळ यांनी एक टोकाची भूमिका घेतली. पण ती भूमिका त्यांना घ्यायला लावली. भुजबळांचा पुरेपूर वापर त्या काळात झाला. जरांगे यांच्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा वापर झाला असे स्पष्ट दिसत होते. नाहीतर इतकी टोकाची भूमिका भुजबळ घेऊ शकत नव्हते. ज्यांनी त्यांना टोकाची भूमिका घ्यायला लावली, त्यांनी भुजबळांना वाऱ्यावर सोडले हे माझे आकलन असल्याचे त्यांनी म्हटले.  

त्यांना हातात एखादं खेळणं दिले जाईल अन्...

भुजबळांनी आता कितीही आदळआपट केला तरी त्यांची लढण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता किती आहे? हे पाहावे लागेल. महाराष्ट्रात जातीय सलोखा, समन्वय राहावा ही आमची भूमिका आजही आहे. बाकी आता इतर काही लोक अश्रू ढाळत आहेत त्यांच्या अश्रूंना कोण विचारत आहे? त्यांच्या अश्रूंना काय किंमत आहे? रडतील आणि गप्प बसतील. कारण एखादा-दुसरा आमदार नाराज झाला म्हणून या सरकारला तडा जाईल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे हे काही दिवस रडतील, त्यांना हातात एखादं खेळणं दिले जाईल आणि सगळे शांत राहतील, असा टोला संजय राऊत यांनी महायुतीतील नाराज आमदारांना लगावला. 

संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे नग आणि नमुने आहेत, त्या संदर्भात फडणवीसांनी स्वतः अभ्यास करावा. काही वर्षांपूर्वी याच नमुन्यांविषयी आपण काय भूमिका घेतली होती? काय संशोधन केले होते? किती प्रकारचे भ्रष्टाचाराचे पेपर्स आपण राज्यपालांकडे सोपवले होते? हे सगळे नग आणि नमुने घेऊन फडणवीस राज्य करत आहेत. ते आता आदर्श कारभार करणार आहेत, असे मी वाचले आणि आमचे मनोरंजन झाले. पुढील पाच वर्षात असे मनोरंजनाचे अनेक प्रसंग आम्हाला पाहायला मिळतील, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 

अदृश्य शक्तीमुळे भुजबळांचा बळी 

जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं, असं छगन भुजबळ यांनी म्हटले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मी भुजबळ आणि जरांगे वादात पडणार नाही. तो त्यांनी स्वीकारलेला मार्ग होता. भुजबळ टोकाची भूमिका घेताना दिसत होते. पण, त्यांच्या मागे अदृश्य शक्ती होती. त्या शक्तीने त्यांना वाऱ्यावर सोडलं. जी अदृश शक्ती शिंदे यांच्या मागे पक्ष फोडण्यासाठी होती, तीच अदृश्य शक्ती भुजबळांना उत्तेजन देत होती, त्यात भुजबळांचा बळी गेला, असा दावा त्यांनी केलाय.

आणखी वाचा 

Ajit Pawar : छगन भुजबळ यांचं नाराजीनाट्य, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भेटणं टाळलं, राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Hindu Sanghatna| नागपुरात संचारबंदी असताना हिंदू संघटनांकडून एकत्र येऊन नारेबाजी व आंदोलनABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 March 2025ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 19 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सRSS On Aurangzeb :औरंगजेबचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, संघाने कान टोचले: Majha Special Discussion

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
Embed widget