हार्दिक पांड्याची माघार...रोहित, विराट, बुमराहबाबत गौतम गंभीर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?, श्रीलंका दौऱ्याआधी घडामोड
India vs Sri Lanka: रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा हे सर्व दिग्गज खेळाडू सध्या सुट्टीवर आहेत.
Team India India vs Sri Lanka: टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया (Team India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (Ind vs SL) खेळवण्यात येणार आहे. पहिला टी-20 सामना 27 जुलै रोजी असेल, तर दौऱ्यातील शेवटचा एकदिवसीय सामना 2 ऑगस्टला असेल.
टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) फॉरमॅटमधून राजीनामा दिला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे दिलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसल्याची माहिती हार्दिक पांड्याने बीसीसीआयला दिली आहे.
रोहित-विराट-बुमराह श्रीलंका दौऱ्यात दिसणार?
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा हे सर्व दिग्गज खेळाडू सध्या सुट्टीवर आहेत. तसेच श्रीलंकाविरुद्धच्या दौऱ्यातही ते सहभागी होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र रोहित, विराट, बुमराह, जडेजाने एकदिवसीय सामन्यासाठी संघात सामील व्हावे, यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आग्रही असल्याची माहिती मिळत आहे.
Gautam Gambhir keen to have Rohit, Bumrah, Kohli and Jadeja for the ODIs against Sri Lanka as there'll be a long 6 weeks break for team India. (Express Sports). pic.twitter.com/VGYPJNzp85
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 16, 2024
गौतम गंभीर पुढं कोणतं लक्ष्य?
भारतीय क्रिकेट संघानं आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोनवेळा प्रवेश केला होता. दोन्ही वेळा भारताला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं. आता तिसऱ्या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचं टीम इंडियाचं धोरण आहे. या विजेतेपदाच्या अनुषंगानं टीम इंडियाची बांधणी करणं आणि विजेतेपद खेचून आणणं ही गौतम गंभीरवर जबाबदारी असेल. भारतानं 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. ही स्पर्धा जिंकवणं देखील गौतम गंभीर पुढं आव्हान असेल.
केएल राहुलला नेतृत्वाची संधी-
रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसल्यास यष्टीरक्षक केएल राहुल टीम इंडियाचं नेतृत्व करु शकतो. तर टी-20 मालिकेची धुरा हार्दिक पांड्याकडे दिली जाऊ शकते.
टी20 मालिकेचं वेळापत्रक
पहिली टी 20 मॅच : 27 जुलै
दुसरी टी 20 मॅच : 28 जुलै
तिसरी टी 20 मॅच : 30 जुलै
एकदिवसीय सामन्यांचं वेळापत्रक
पहिली मॅच :2 ऑगस्ट
दुसरी मॅच : 4 ऑगस्ट
तिसरी मॅच : 7 ऑगस्ट
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'