अंबानींच्या लग्नात हार्दिक पांड्याची हवा...; अभिनेत्री अनन्यासोबत थिरकला, सर्वांत जास्त चर्चेत असणारा Video
Hardik Pandya Ananya Panday Dances at Anant-Radhika wedding: हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Hardik Pandya Ananya Panday Dances at Anant-Radhika wedding: गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) चांगलाच चर्चेत आहे. आयपीएल, मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद, पत्नी नताशा स्टॅनकोव्हिचपासून (Natasha Stankovic) घटस्फोट, टी-20 विश्वचषक आणि आयसीसी क्रमवारीत प्रथम क्रमांक अशा घटनांमुळे हार्दिक पांड्याच्या चर्चा सुरु आहे. याचदरम्यान अनंत अंबानी (Anant Ambani)-राधिका मर्चंटच्या (Radhika Merchant) लग्नात हार्दिक पांड्याने केलेल्या डान्सनची चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हार्दिक पंड्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात आपला भाऊ कृणाल पंड्या आणि मित्र इशान किशनसोबत पोहोचला होता. लग्नात अनन्या पांडे देखील सहभागी झाली होती. या लग्नाला इतर अनेक क्रिकेटर्सनीही हजेरी लावली होती. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, अजिंक्य रहाणे, युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती.
हार्दिक आणि अनन्याचा डान्स व्हिडीओ-
VIDEO | Cricketer Hardik Pandya (@hardikpandya7) and actress Ananya Panday (@ananyapandayy) groove to music at the wedding of Anant Ambani and Radhika Merchant in Mumbai. #AnantRadhikaWedding pic.twitter.com/zxYWuQcjxm
— Press Trust of India (@PTI_News) July 12, 2024
हार्दिक पांड्याचे अंबानी कुटुंबासोबत जुने नाते-
हार्दिक पांड्याचे अंबानी कुटुंबाशी खूप जुने नाते आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असून या संघाची मालकी अंबानी कुटुंबीय कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहे. अंबानी कुटुंबाच्या वतीने नीता अंबानी आणि आकाश अंबानी या संघाचे व्यवस्थापन करतात. आयपीएल 2015 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने हार्दिकला अवघ्या 10 लाख रुपयांना खरेदी केले होते. एका वर्षानंतर हार्दिकने भारतीय संघातून खेळायला सुरुवात केली. तो सात वर्षे मुंबई इंडियन्सकडून खेळला आणि संघाला चार आयपीएल विजेतेपद मिळवून दिले. यानंतर हार्दिक दोन वर्षे गुजरात टायटन्सकडून खेळला आणि नंतर 2024 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये परतला. येथे त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि त्याच्या जागी रोहित शर्माची निवड करण्यात आली. रोहितने दहा वर्षे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवले आणि पाच वेळा संघाला चॅम्पियन बनवले.
हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाची चर्चा-
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अंतिम षटकात टिच्चून मारा करीत भारताला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्या पुन्हा एकदा भारतीयांसाठी हीरो झाला आहे. पण, असे असले तरी हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिच यांच्यात आलबेल नसल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. हार्दिक पांड्या सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियासाठी हार्दिकची चमकदार कामगिरी आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घटस्फोटाच्या बातम्यांमुळे तो सतत चर्चेत असतो. टी-20 विश्वचषकात हार्दिक टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा ठरला.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'
हार्दिक पांड्यासोबत फोटो टाकताच प्रसिद्धीच्या झोतात आली; कोण आहे प्राची सोलंकी?