एक्स्प्लोर

India vs Pakistan : IPL च्या पठ्ठ्यांनी पाकिस्तानला लोळवलं, थरारक विजयानंतर टीम इंडियाची पॉइंट टेलबमध्ये मोठी झेप

इमर्जिंग आशिया कपदरम्यान युवा आयपीएल स्टार्सनी सजलेल्या भारत अ संघाने पाकिस्तानचा 07 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या मुंबई इंडियन्सचे चार खेळाडू प्लेइंग 11 चा भाग होते.

ACC T20 Emerging Teams Asia Cup 2024 India beat Pakistan : चाहते आयपीएल 2025 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धांनी जागतिक क्रिकेटला अनेक महान खेळाडू दिले आहेत. नुकतेच आयपीएलच्या युवा स्टार्सच्या जोरावर भारत अ संघाने इमर्जिंग आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. भारत अ संघाने हा सामना 07 धावांनी जिंकला. दोन्ही संघांमधील हा सामना ओमानमधील ओमान क्रिकेट अकादमीमध्ये खेळला गेला. शेवटच्‍या षटकापर्यंत रंगलेल्‍या या सामन्‍यात भारताच्या युवा खेळाडूंनी या दडपणाचा चांगला सामना करत या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला.

पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारत अ संघातील सर्व खेळाडू आयपीएलचे युवा स्टार आहेत. अलीकडेच या खेळाडूंनी आयपीएलमध्ये नाव कमावले. या संघात केवळ तीन खेळाडू होते ज्यांनी भारतीय वरिष्ठ संघासाठी पदार्पण केले आहे. ज्यामध्ये अभिषेक शर्मा, कॅप्टन तिलक वर्मा आणि राहुल चहर यांच्या नावाचा समावेश आहे. राहुल चहर बऱ्याच दिवसांपासून वरिष्ठ संघाबाहेर आहे. आयपीएलमध्ये अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबादकडून, तिलक वर्मा मुंबई इंडियन्सकडून आणि राहुल चहर पंजाब किंग्जकडून खेळतो.

इतर खेळाडूंबद्दल बोलायचे तर सलामीवीर प्रभसिमरन सिंगलाही या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात प्रभसिमरन सिंगने 19 चेंडूत 36 धावा केल्या. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो. रमणदीप सिंगही प्लेइंग 11 चा भाग होता. त्याने बॅटने काही विशेष केले नसेल, पण क्षेत्ररक्षणात त्याने चमकदार खेळ केला. रमणदीप सिंग आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो.

या सामन्यात सामनावीर ठरलेला अंशुल कंबोज मुंबई इंडियन्सकडून खेळतो. नेहल वढेरा देखील मुंबई इंडियन्सचा एक भाग आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचे एकूण 4 खेळाडू सहभागी झाले होते. याशिवाय निशांत सिंधू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून, रसिक दार सलाम दिल्ली कॅपिटल्सकडून आणि वैभव अरोरा कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो.

अशी आहे पॉइंट टेबलची स्थिती(ACC T20 Emerging Teams Asia Cup 2024 Points Table)

टीम इंडिया आता टी-20 इमर्जिंग एशिया कप 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. टीम इंडियाचा नेट रन रेट सध्या +0.350 आहे. याशिवाय UAE संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. यूएईने पहिल्या सामन्यात ओमानचा पराभव केला होता. UAE चा निव्वळ रन रेट +0.378 आहे.

स्पर्धेत 8 संघ सहभागी  

टी-20 इमर्जिंग एशिया कप 2024 मध्ये एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. सर्व आठ संघ प्रत्येकी 4 च्या दोन गटात विभागले गेले आहेत. टीम इंडिया अ, UAE, ओमान आणि पाकिस्तानला ग्रुप-अ मध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय बांगलादेश अ, अफगाणिस्तान अ, श्रीलंका अ आणि हाँगकाँग अ यांना गट-ब मध्ये ठेवण्यात आले आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्तानने ब गटातील विजयांसह आशिया चषक मोहिमेची सुरुवात केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
Small Savings Schemes : सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफसह इतर योजनांचे व्याज दर जाहीर, केंद्राचा मोठा निर्णय
सुकन्या समृद्धी योजनेसह इतर बचत योजनांचे व्याज दर जाहीर, सर्व व्याज दर एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case Update : देशमुख हत्या प्रकरण, आरोपी सुदर्शन घुलेने सांगितली संपूर्ण घटनाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 28 March 2025Job Majha : Agricultural Scientists Recruitment Board मध्ये नोकरीची संंधी, शैक्षणिक पात्रता काय?100 headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 28 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
Small Savings Schemes : सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफसह इतर योजनांचे व्याज दर जाहीर, केंद्राचा मोठा निर्णय
सुकन्या समृद्धी योजनेसह इतर बचत योजनांचे व्याज दर जाहीर, सर्व व्याज दर एका क्लिकवर
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Embed widget