IND vs PAK : विराट कोहलीला म्हणावं कितीही जोर लाव, पाकिस्तानविरोधात टीम इंडिया जिंकणार नाही म्हणजे नाही; कुंभमेळ्यातील IIT वाल्या बाबाची मोठी भविष्यवाणी
IND vs PAK : विराट कोहलीला म्हणावं कितीही जोर लाव, पाकिस्तानविरोधात टीम इंडिया जिंकणार नाही म्हणजे नाही; कुंभमेळ्यातील IIT वाल्या बाबाची मोठी भविष्यवाणी

IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) ला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. भारताने पहिला सामन्यात बांगलादेशचा पराभव करत विजयी सलामी दिली आहे. आता भारताचा दुसरा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी असणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. एकीकडे टीम इंडिया पाकिस्तानवर विजय मिळवण्यासाठी सराव करत असताना महाकुंभमधील एका आयआयटी वाल्या बाबाने मोठी भविष्यवाणी केली आहे.
Baba Said "Indian Cricket team Won't Win his Match against Pakistan" 😭
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 20, 2025
pic.twitter.com/YuD6myzPob
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या सर्वात मोठ्या महाकुंभचं आयोजन करण्यात आलंय. महाकुंभ असल्याने गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी जगभरातील लोक प्रयागराजमध्ये पोहोचत आहेत. दरम्यान, कुंभमेळ्यातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे तिथे उपस्थित असणारे बाबा आहेत. वेगवेगळ्या विचारांचे आणि आखाड्यांचे अनेक बाबा या कुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत. त्यामुळे बाबांवर श्रद्धा असणाऱ्या लोकांनी तिथं जात दर्शन घेण्यास सुरुवात केलेलंही पाहायला मिळालं.
Baba Said "Indian Cricket team Won't Win his Match against Pakistan" 😭
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 20, 2025
pic.twitter.com/YuD6myzPob
कुंभमेळ्यातील IIT बाबांची मोठी भविष्यवाणी
आयआयटीमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या एक बाबा कुंभमेळ्यात गेल्यानंतर लोकप्रिय झाला आहे. कुंभमेळ्यात या बाबाच्या मोठ्या चर्चाही झाल्या आहेत. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असलेल्या या बाबाने भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याबाबत हैराण करणारी भविष्यवाणी केली आहे. ज्यामुळे टीम इंडियाचे अनेक चाहते देखील हैराण झाले आहेत. विराट कोहलीला म्हणावं कितीही जोर लाव, पाकिस्तानविरोधात टीम इंडिया जिंकणार नाही म्हणजे नाही, असं या बाबाने म्हटलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात भारताकडून बांगलादेशचा पराभव
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतील (Champions Trophy 2025) पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव केलाय. शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवलाय. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने टीम इंडियासमोर 229 धावांचे लक्ष ठेवले होते. बांगलादेशचे 229 धावांचे आव्हान टीम इंडियाने 47 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केले.
Baba Said "Indian Cricket team Won't Win his Match against Pakistan" 😭
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 20, 2025
pic.twitter.com/YuD6myzPob
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज