Commonwealth Games : भारताला मोठा धक्का; हॉकी-शूटिंग, क्रिकेट, बॅडमिंटनसह अनेक स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्समधून बाहेर
कॉमनवेल्थ गेम्समधून भारतासाठी मोठी बातमी येत आहे. त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्समधून भारताच्या पदक जिंकण्याच्या शक्यतांना मोठा फटका बसला आहे.
![Commonwealth Games : भारताला मोठा धक्का; हॉकी-शूटिंग, क्रिकेट, बॅडमिंटनसह अनेक स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्समधून बाहेर Commonwealth Games Blow to India Medal Prospects as Cricket Hockey Westling Among Sports Axed From Glasgow 2026 Marathi news Commonwealth Games : भारताला मोठा धक्का; हॉकी-शूटिंग, क्रिकेट, बॅडमिंटनसह अनेक स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्समधून बाहेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/22/ae59b03ae15aa0a263de2229fa6f59ab17295890350331091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Commonwealth Games Update : कॉमनवेल्थ गेम्समधून भारतासाठी मोठी बातमी येत आहे. त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्समधून भारताच्या पदक जिंकण्याच्या शक्यतांना मोठा फटका बसला आहे. यजमान शहर ग्लासगोने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी यासारख्या प्रमुख खेळांना 2026 मध्ये होणाऱ्या गेम्सच्या कार्यक्रमातून काढून टाकले आहे.
Wrestling, badminton, hockey, cricket and shooting among major sports excluded from 2026 Glasgow Commonwealth Games schedule
— Press Trust of India (@PTI_News) October 22, 2024
खर्च मर्यादित करण्यासाठी टेबल टेनिस, स्क्वॅश आणि ट्रायथलॉन देखील वगळण्यात आले आहेत. बर्मिंगहॅम येथे 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये समाविष्ट नऊ खेळ पुढील गेम्सचा भाग असणार नाहीत. 2026 मध्ये 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत कॉमनवेल्थ गेम्स होणार आहेत. ग्लासगोने यापूर्वी 2014 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते.
Glasgow confirmed as the hosts of the 2026 Commonwealth Games!👏
— Commonwealth Sport (@thecgf) October 22, 2024
👀 Read the full announcement here | https://t.co/9FNaxziTdS#Glasgow2026 pic.twitter.com/WGg77QuO3s
"क्रीडा कार्यक्रमात ॲथलेटिक्स आणि पॅरा ॲथलेटिक्स (ट्रॅक आणि फील्ड), स्विमिंग आणि पॅरा स्विमिंग, जिम्नॅस्टिक्स, ट्रॅक सायकलिंग आणि पॅरा ट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो, बोल्स यांचा समावेश आहे. यासोबत एक स्टेटमेंट आणि पॅरा बाऊल्स, 3×3 बास्केटबॉल आणि 3×3 व्हीलचेअर बास्केटबॉल समाविष्ट केले आहेत असे कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने सांगितले.
निवेदनानुसार, "हे खेळ स्कॉटटाउन स्टेडियम, टोलक्रॉस इंटरनॅशनल स्विमिंग सेंटर, एमिरेट्स एरिना आणि स्कॉटिश कॉम्पिटिशन कॉम्प्लेक्स (SEC) या चार ठिकाणी आयोजित केले जातील. खेळाडू आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफला हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल.
Cricket is not in 2026 CWG Games in Glasgow, Scotland along with several other sports being axed. (Like hockey, badminton, wrestling , shooting etc.) Only 10 sports in total.
— Kausthub Gudipati (@kaustats) October 22, 2024
Women's T20 was part of the original list of sports in 2026 CWG at Victoria, after successfully being… pic.twitter.com/eK0Effjhqd
ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारताच्या पदकांच्या संभाव्यतेसाठी एक मोठा धक्का आहे, कारण याआधी त्यांनी काढलेल्या खेळांमध्ये बहुतेक पदके जिंकली होती. बर्मिंगहॅम गेम्सच्या कार्यक्रमातून शूटिंग देखील काढून टाकण्यात आले होते आणि ते परत येण्याची फारशी आशा दिसत नाही.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)