एक्स्प्लोर
कोल्हापूरच्या राही सरनोबतचा सुवर्णवेध, भारताला आणखी एक गोल्ड
राहीने 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत भारताला मिळालेलं हे चौथं सुवर्णपदक आहे.

जकार्ता: कोल्हापूरच्या राही सरनोबतने आशियाई क्रीडा स्पर्धा गाजवली आहे. राहीने 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेत भारताला मिळालेलं हे चौथं सुवर्णपदक आहे.
27 वर्षीय राहीने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. मात्र याच प्रकारात स्टार नेमबाद मनू भाकरने निराशा केली. फायनलमध्ये 16 वर्षीय मनूला केवळ 16 गुणच मिळवता आले. मात्र राहीने तिची कसर भरुन काढत थेट सोनं टिपलं.
शेवटच्या मालिकेत राहीचे तीनही लक्ष्य चुकले होते. मात्र दबावामुळे थायलंडच्या नेमबाजाचेही निशाणे चुकले. त्यानंतर दोघींमधील निर्णय शूटऑफने झाला. त्यामुळे या दोघींमधील फायनल अत्यंत चुरशीची झाली. शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकेल याचा अंदाजच लावता येत नव्हता.
मग शेवटच्या मालिकेत राहीने केवळ 2 निशाणे चुकवले. मात्र थायलंडच्या नेमबाजाने 3 निशाणे चुकवल्याने राहीने एशियाडमध्ये तिरंगा उंचावला.
आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी राही ही पहिली भारतीय महिला शूटर ठरली आहे.
राहीने 2010 दिल्ली आणि 2014 ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 25 मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. यानंतर ती जखमी झाल्याने तिने ब्रेक घेतला होता. पण पुन्हा राहीने कंबर कसून जिद्दीने मेहनत घेतली. त्याचं फळ आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकाच्या रुपाने मिळालं.
संबंधित बातम्या
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरचा नाद खुळा, राही सरनोबतचाही सुवर्णवेध !
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
