एक्स्प्लोर
विराट-महिपालच्या अर्धशतकावर साल्टची खेळी भारी, दिल्लीचा आरसीबीवर विजय
दिल्लीने प्लेऑफमधील आपले आव्हान जिवंत ठेवलेय. दिल्लीचा दहाव्या सामन्यातील हा चौथा विजय आहे.

RCB,IPL 2023
1/6

DC vs RCB, IPL 2023 : फिल साल्टच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर दिल्लीने आरसीबीचा सात विकेटने पराभव केला. आरसीबीने दिलेले 182 धावांचे आव्हान दिल्लीने सात विकेट आणि 20 चेंडू राखून सहज पार केले. या विजयासह दिल्लीने प्लेऑफमधील आपले आव्हान जिवंत ठेवलेय.
2/6

दिल्लीचा दहाव्या सामन्यातील हा चौथा विजय आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दिल्लीला उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे. दुसरीकडे आरसीबीचे प्लेऑफमधील आव्हान अधीक खडतर झालेय. प्लेऑफमध्ये पोहचण्याचे चान्स आरसीबीचे फक्त ३४ टक्के इतकेच आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला उर्वरित सामन्यात विजय मिळवावा लागेल.
3/6

आरसीबीने दिलेल्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने वादळी सुरुवात केली. खासकरुन फिल साल्ट याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. फिल साल्ट याने आरसीबीच्या गोलंदाजांची कत्तल केली. साल्ट याने आऱसीबीच्या प्रत्येक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. साल्ट याने ४५ चेंडूत ८७ धावांची वादळी खेळी केली. या खेळीत साल्टने सहा षटकार आणि आठ चौकार लगावले. रायली रुसो याने २२ चेंडूत ३५ धावांचे योगदान दिले. तर मिचेल मार्श याने २६ आणि वॉर्नरने २२ धावांचे योगदान दिले.
4/6

साल्ट आणि वॉर्नर यांनी पाच षटकात ६० धावांची सलामी दिली. वॉर्नरने एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने २२ धावांची खेळी केली. मिचेल मार्श याने एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने २६ धावांचे योगदान दिले.
5/6

फिल साल्ट बाद झाल्यानंतर रुसोने दिल्लीला सहज विजय मिळवून दिला. रुसोने तीन षटकार आणि एक चौकार लगावत नाबाद ३५ धावांची खेळी केली. अक्षर पटेल याने एका षटकारासह आठ धावांची खेळी केली.
6/6

आरसीबीच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. दिल्लीच्या फलंदाजांनी प्रत्येक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. साल्ट याचा १७ धावांवर दिनेश कार्तिक याने झेल सोडला.. त्यानंतर साल्ट याने आक्रमक फलंदाजी करत ८७ धावांची खेळी केली. कर्ण शर्मा, हेजलवूड आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
Published at : 06 May 2023 11:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
