एक्स्प्लोर
PHOTO : CSK चा अष्टपैलू शिवम दुबे आणि अंजुम खानची प्रेमकहाणी

Anjum Khan Shivam Dube
1/7

शिवम दुबेच्या धडाकेबाज खेळीमुळे CSK ला चालू मोसमात सलग चार पराभवानंतर पहिला विजयाची चव चाखता आली. या खेळीमुळे शिवम दुबेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. केवळ त्याचा खेळच नाही तर त्याच्या प्रेमकहाणीची किस्सेही शेअर केले जात आहेत. जाणून घेऊया शिवम दुवेची प्रेमकहाणी.
2/7

शिवम दुबेने जुलै 2021 मध्ये गर्लफ्रेण्ड अंजुम खानसोबत लग्न केले. शिवम दुबे आणि अंजुम यांचे लग्न मुंबईत झाले होते. शिवम दुबेने स्वतः लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
3/7

शिवम आणि अंजुम यांचा विवाह हिंदू-मुस्लिम रितीरिवाजांनुसार झाला होता. जिथे लग्नाच्या शेअर केलेल्या फोटोमध्ये शिवम दुबे आणि अंजुम खान दुवासाठी हात वर करताना दिसले.
4/7

तर एका फोटोमध्ये शिवम दुबे आणि अंजुम खान एकमेकांना हार घालताना तर शिवम अंजुमच्या भांगेत कुंकू भरताना दिसत होता.
5/7

शिवम दुबेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शिवम दुबेने भारताकडून आतापर्यंत 13 टी-20 आणि एक वनडे खेळला आहे. या अष्टपैलू खेळाडूच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 105 धावा आणि 5 विकेट्सची नोंद आहे.
6/7

शिवम दुबेची पत्नी अंजुम खान ही उत्तर प्रदेशची आहे आणि तिने अलीगड मुस्लिम विद्यापीठातून (एएमयू) फाईन आर्ट्स शाखेत पदवी मिळवली आहे. त्याच वेळी, शिवम दुबे मुंबईत लहानाचा मोठा झाला आणि त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला उंचीवर नेले.
7/7

अंजुम खानला अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये खूप रस आहे. हिंदी मालिकांव्यतिरिक्त तिने म्युझिक अल्बममध्येही काम केले आहे. अंजुम खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, जिथे ती वेळोवेळी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
Published at : 14 Apr 2022 07:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
