मंथन परीक्षेत मिळाले कमी गुण, चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं माढा हादरलं
सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंथन परीक्षेत (Manthan exam) कमी गुण मिळाल्याने चौथीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंथन परीक्षेत (Manthan exam) कमी गुण मिळाल्याने माढ्याच्या दारफळमधील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनं परिसर हादरुन गेला आहे. स्पर्धेच्या युगात इतक्या टोकाची मानसिकता विद्यार्थ्यांची बनवू लागल्यानं हा गंभीर विषय होत आहे.
घराशेजारील आंब्याच्या झाडाला घेतला गळफास
सध्या मंथनसारख्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने चौथीतील शाळकरी विद्यार्थ्याने उचललेले टोकाचे पाऊल धक्कादायक आहे. शंभुराजे नवनाथ बारबोले असं त्या मुलाचे नाव आहे. घराशेजारील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन त्याने जीवन संपवलं आहे. मंथन परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शाळकरी विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहीती समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Thane: गर्लफ्रेंडला फोन केला, बोलता बोलता भांडण टोकाला गेलं, रागाच्या भरात 18 वर्षांच्या मुलानं नको ते पाऊल उचचलं, ठाण्यात खळबळ























