Raj Thackeray : राज ठाकरेंकडून भाषणाच्या दुसऱ्याच मिनिटाला ईव्हीएमच्या मुद्याला हात, मतदारांचे आभार मानत म्हणाले...
Raj Thackeray Speech Live : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाराष्ट्र सैनिकांना संबोधित केलं.

Raj Thackeray Speech मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवरील मेळाव्यात महाराष्ट्र सैनिकांना संबोधित केलं. यावेळी राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा मुद्दा मांडला. राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
राज ठाकरे म्हणाले, सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...हा हरलेला पक्ष?, झालं निवडणुका संपल्या. आज निवडणुकीत ज्यांनी मतदान करुन ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. ज्या मतदारांनी मतदान करुन देखील ईव्हीएममध्ये ज्यांची मत दिसली नाहीत त्यांचे ही आभार मानतो, असं राज ठाकरे म्हणाले. काही काही गोष्टी घडल्या त्याच्यावर बोलून झालेलं आहे.
जे झालं ते झालं, आता पुढचं काय ते पाहायचंय आहे. तुम्ही सगळे वेळ काढून आलेत ना...मला खूप बोलायचं आहे. गेल्या काही दिवसांत ज्या घटना घडल्या त्याबद्दल बोलायचंय, अनेक विषय झाले, अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे शुभेच्छांचे फोन मला आले. आजचं फोन आले. आज का आले याचे अर्थ मला समजतात. जरा जपून पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या त्या तुम्हाला सांगणं आवश्यक आहेत, गरजेच्या आहेत. त्यातील पहिला विषय कुंभमेळा - मी म्हटल्याप्रमाणं बाळा नांदगावकरांनी पाणी आणून दिलं, ते मी पिणार नाही असं सांगितलं. मग नव्यानं वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला, मूर्ख आहात का? , असं राज ठाकरेंनी म्हटलं.
आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे आतमध्ये गेल्यावर आह आहा वाटलं म्हणाले. त्याला म्हटलं खालून एखादं प्रेत गेलं असेल.नद्यांची काय भीषण अवस्थाय ते तिथं पाहायला मिळालं, ज्यांना आपण देवी म्हणतो, गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारे राजकारणातील पहिली व्यक्ती म्हणजे राजीव गांधी, तेव्हा पासून गंगा साफ केली जाते. 2014 ला मोदी पंतप्रधान झाले त्यांनी सांगितलं गंगा साफ करणार, आपल्या नद्यांची अवस्था अशी आहे पाणी पिणं सोडा, उत्तर भारतातील लोकं येऊन गेले अंघोळ केल्यानंतर लाखो लोकं आजारी पडलेत असं सांगितलं. प्रश्न गंगेच्या अपमानाचा, कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाही, पाण्याचा आहे, असं राजे ठाकरेंनी म्हटलं.
दरम्यान, राज ठाकरे यांनी सभेत लाव रे तो व्हिडिओ म्हणत गंगा नदीच्या सद्याच्या स्थितीचा व्हिडीओ दाखवला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रदुषित नद्यांची नाव देखील वाचून दाखवली.
























