एक्स्प्लोर
Virat Kohli : किंग कोहलीवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस, काही तासात 1 कोटींचा टप्पा ओलंडला
Virat Kohli Instagram : विराट कोहलीनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं विजेतेपद मिळवल्यानंतर निवृत्ती जाहीर केली. यानंतर त्याच्यावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला.

विराट कोहली
1/5

विराट कोहलीनं टी 20 वर्ल्ड कपच्या विजयाबद्दल इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली. विराट कोहलीच्या या पोस्टला जवळपास 10 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक केलं आहे.
2/5

अर्जेंटिनाचा कॅप्टन लिओनेल मेस्सी याच्या पोस्टला इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लाईक आहेत. मेस्सीच्या पोस्टला 48 तासाच्या आत 6 कोटी 40 लाख लाईक्स मिळाले होते. विराटच्या पोस्टनं 1 कोटी लाईक्सचा टप्पा पार केलाय.
3/5

आजच्या दिवसासारखं दुसरं सर्वोत्तम स्वप्न असू शकत नाही. देव महान आहे, मी त्याच्या समोर नतमस्तक होतो, असं विराट कोहली म्हणाला. आम्ही अखेर करुन दाखवलं जय हिंद, अशी पोस्ट विराट कोहलीनं केली आहे.
4/5

भारताला विजय मिळाल्यानंतर विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मॅच जिंकल्यानंतर विराट कोहलीनं पत्नी अनुष्का शर्मा, वामिका आणि अकाय यांच्याशी व्हिडीओ कॉलवरुन संवाद साधला.
5/5

विराट कोहली टी 20 वर्ल्डकपमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करत होता. मात्र, अखेरच्या मॅचमध्ये विराटनं केलेली 76 धावांची खेळी गेमचेंजर ठरली.
Published at : 30 Jun 2024 10:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
