एक्स्प्लोर

Eknath Shinde & Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना शह, मुख्यमंत्र्यांच्या वॉररुमच्या धर्तीवर को-ऑर्डिनेशन रुमची स्थापना

Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सध्या दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. याउलट अजित पवार आणि फडणवीसांची जवळीक वाढली आहे, अशी चर्चा रंगली आहे.

मुंबई: महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुप्त संघर्ष सुरु असल्याच्या चर्चा सातत्याने ऐकायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बहुतांश बैठकांना एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावलेली नाही. पालकमंत्री पदाच्या वादानंतरही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज होऊन साताऱ्याला आपल्या गावी निघून गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती द्यावी लागली होती. यानंतरही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात संघर्ष सुरु असल्याची चर्चा आहे. याचा प्रत्यय आता आणखी एका गोष्टीच्या निमित्ताने आला आहे.  राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉररुममधून आढावा घेतला जातो. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र को-ऑर्डिनेशन रुम स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे यांचे हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह असल्याचे मानले जात आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या को-ऑर्डिनेशन रुमच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात वादाचा दुसरा अंक सुरु झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका वगळता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना बोलावलेल्या बहुतांश विभागाच्या बैठकांना दांडी मारली आहे.  फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या अगदी स्वत:च्या विभागाच्या बैठकांनाही शिंदे हजर राहिले नव्हते. फडणवीस यांनी बोलावलेली 100 दिवसांची आढावा बैठक असो किंवा अलीकडे आयोजित करण्यात आलेली महापालिकांसंदर्भातील बैठक असो, एकनाथ शिंदे कोणत्याही बैठकांना हजर नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याची चर्चा रंगली होती. 

एकनाथ शिंदेंच्या को-ऑर्डिनेशन रुममधून काय काम होणार?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे नगरविकास, म्हाडा, एमएसआरडीसी, एसआरए, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आहेत. या खात्यांच्या सर्व प्रकल्पांचा एकनाथ शिंदे यांच्या को-ऑर्डिनेशन रुममधून आढावा घेतला जाईल. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना आणि सचिवांना वॉर रुमच्या बैठकांप्रमाणे को- ऑर्डिनेशन रुमच्या बैठकांनाही हजर राहावे लागेल. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांची ओढाताण होऊ शकते. त्यामुळे एक समांतर सत्ताकेंद्र तयार होऊ शकते. परिणामी ही को ऑर्डिनेशन रुम एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमला शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याची सूत्रे असताना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली होती. मात्र, आता मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे हा कक्षही एकनाथ शिंदे यांच्या हातातून गेला आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांची जवळीक वाढली, दोन महिन्यांत राजकारणात मोठे बदल होणार: अंजली दमानिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02PM TOP Headlines 02 PM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 01PM TOP Headlines 12 PM 15 March 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaSanjay Raut On Eknath Shinde Congress | एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, राऊतांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karuna Sharma on Dhananjay Munde : जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
जसे मी बोलले, धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Manikrao Kokate : न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
Embed widget