एक्स्प्लोर

RBI News Update: मोठी बातमी, मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयकडून निर्बंध, ठेवीदारांना ठेवी काढण्यास मनाई 

RBI News : भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर अनियमिततांमुळं निर्बंध लादण्यात आले आहेत.

RBI-New India Co-operative Bank Update मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम काढता येणार नाही. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देऊ शकणार नाही किंवा ठेवी देखील स्वीकारु शकणार नाही. आरबीआयनं गुरुवारी 13 फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत.  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील मोठ्या प्रमाणात अनियमतता झाल्यानं बँकेच्या कामकाजावर अनेक प्रकारच्या बँकिग व्यवसायाशी संबंधित निर्बंध घातले आहेत. आरबीआयच्या कठोर भूमिकेनंतर या बँकेला ग्राहकांना कर्ज देता येणार नाही याशिवाय ग्राहकांकडून ठेवी घेण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर ठेवीदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. बँकेचे खातेधारक आता त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. आरबीआयनं सध्या बँकेवर केवळ सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. त्यामुळं या काळात बँकेची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. सहा महिन्यानंतर आरबीआय त्यांच्या निर्णयाचं पुनरावलोकन करेल. 

आरबीआयनं म्हटलं, बँकेकडील सध्याची रोकड स्थिती पाहता हा निर्देश देण्यात येतो की ठेवीदारांच्या बचत खाते किंवा चालू खात्यातील, इतर खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम काढण्याची परवानगी देऊ नये. मात्र, बँक कर्मचाऱ्यांचं वेतन, भाडे आणि वीज बील यासाठी आवश्यक गोष्टींवर खर्च करण्यास बँकेला परवानगी देण्यात आली आहे.  

आरबीआयनं स्पष्ट केलं की , 13 फेब्रुवारी 2025 ला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर बँक आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतंही कर्ज देणार नाही किंवा अॅडव्हान्स रक्कम देईल किंवा कर्जाचं नुतनीकरण करणारन नाही. याशिवाय बँकेला ना गुंतवणुकीची परवानगी असेल ना ठेवी स्वीकारण्याची किंवा कोणतीही देणी देण्याची सूट असेल. बँकेत अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळं  नियामक गोष्टी आणि बँकेच्या ठेवीदारांच्या हितांच्या रक्षणासाठी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय पात्रताधारक ठेवीदार डिपॉजिटर्स डिपॉजिट इन्शूरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरशेनकडून त्यांच्या ठेवीवर 5 लाखर रुपयांपर्यंतच्या डिपॉजिट इन्शूरन्स क्लेम मिळवण्यास पात्र आहेत. 

इतर बातम्या :

Gold Rate : सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, 2025 मध्ये सोनं 10000 रुपयांनी महागलं, 10 ग्रॅमसाठी 'इतके' पैसे मोजावे लागणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल
दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल
Satish Bhosale : माणसं सोडा पण सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही; हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली
माणसं सोडा पण सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही; हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली
गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक
गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane | हे कसली तक्रार करतात, यांनी लोकांचे छळ केले; अनिल परब VS नितेश राणे यांच्यात खडाजंगीAmbadas Danve | तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परबांच्या व्यक्तव्याचा अनर्थ होतोय, दानवेंचं स्पष्टीकरणAnil Parab News | समज देण्याचा अधिकार सभापतीना, इतरांना नाही..अनिल परब- राणेंमध्ये खडाजंगीSanjay Raut PC | नामर्द, डरफोक पळून गेलेत, ते फक्त उड्या मारायचे, संजय राऊतांची शिंदेंवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
राज्यासमोर आर्थिक संकट वाढले, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही!
दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल
दुधना नदीतील कारवाईदरम्यान महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला; 7 जणांवर गुन्हा दाखल
Satish Bhosale : माणसं सोडा पण सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही; हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली
माणसं सोडा पण सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही; हरीण, ससे, मोर अन् शेकडो काळवीटं शिजवून खाल्ली
गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक
गाड्या सांभाळा... उन्हाच्या तीव्रतेनं लागली आग, रेल्वे स्टेशनजवळील दुचाकी जळून खाक
Devendra Fadnavis on Nana Patole : 'जयंतराव आमचा विदर्भातील आवाज दाबणार असाल, तर...' नाना पटोलेंवरून सीएम फडणवीस नेमकं काय म्हणाले?
'जयंतराव आमचा विदर्भातील बुलंद आवाज दाबणार असाल, तर...' नाना पटोलेंवरून सीएम फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Kirit Somaiya : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
Jalna Crime News : लोखंडी सळईने अंगभर चटके देणाऱ्या ठाकरे गटाचा पदाधिकारी नवनाथ दौडचा आणखी एक कारनामा उघड; पैशाच्या वादातून अंगावर गेला धावून अन्..
लोखंडी सळईने अंगभर चटके देणाऱ्या ठाकरे गटाचा पदाधिकारी नवनाथ दौडचा आणखी एक कारनामा उघड; पैशाच्या वादातून अंगावर गेला धावून अन्..
Santosh Deshmukh Photos Videos: संतोष देशमुखांच्या मारहाणीचा काळीज पिळवटून टाकणारा आणखी एक व्हिडीओ समोर, कळवळत असतानाही हैवान मारत राहिले
संतोष देशमुखांच्या मारहाणीचा काळीज पिळवटून टाकणारा आणखी एक व्हिडीओ समोर, कळवळत असतानाही हैवान मारत राहिले
Embed widget