एक्स्प्लोर
Ind vs Aus 5th Test : सिडनी कसोटीदरम्यान बदलला कर्णधार, कोहलीला मिळाली टीम इंडियाची कमान, जाणून घ्या कारण
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-24 ची पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनी येथे खेळली जात आहे.

Ind vs Aus 5th Test
1/5

सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे भारताची कमान सोपवण्यात आली होती. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह अचानक मैदानाबाहेर गेला.
2/5

या सामन्यात सर्वात मोठा बदल कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने पाहायला मिळाला. रोहितला सिडनी कसोटीतून वगळण्यात आले.
3/5

सिडनी कसोटीत बुमराहने पहिल्या दिवशी संघाचे नेतृत्व केले पण दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रानंतर मैदान सोडले, त्यानंतर कोहलीने संघाची कमान सांभाळली.
4/5

समालोचन करत असलेल्या रवी शास्त्री म्हणाले की, बुमराहला स्कॅनसाठी मैदानाबाहेर नेण्यात आले असावे. बुमराह आधी मैदानाबाहेर होता आणि त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर तो मेडिकल टीमसोबत स्टेडियममधून बाहेर पडताना दिसला.
5/5

बुमराह मेडिकल टीम आणि सपोर्ट स्टाफसह कारमधून बाहेर गेला. बुमराहचे असे बाहेर जाणे ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत बुमराहने 10 षटके टाकली आहेत, ज्यात त्याने 2 बळी घेतले आहेत.
Published at : 04 Jan 2025 10:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
राजकारण
राजकारण
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
