एक्स्प्लोर
Hardik Pandya : हार्दिक पांड्या टी 20 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व करणार? उपकॅप्टन पदासाठी दोन जण शर्यतीत
IND vs SL : भारतीय क्रिकेट संघ टी 20 आणि वनडे मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताचं नेतृत्त्व हार्दिक पांड्या करण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्या
1/5

रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. यामुळं बीसीसीआयला टी 20 मध्ये भारतासाठी नव्या कॅप्टनची निवड करावी लागणार आहे.
2/5

टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा उपकॅप्टन म्हणून हार्दिक पांड्यानं जबाबदारी पार पाडली होती. हार्दिक पांड्याकडे श्रींलकेविरुद्ध टी 20 मालिकेसाठी नेतृत्त्व दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. हार्दिक पांड्या केवळ टी 20 मालिकेत उपलब्ध असून त्यानं वनडेतून वैयक्तिक कारणांमुळं माघार घेतलेली आहे.
3/5

बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयनं वृत्त दिलं आहे. हार्दिक पांड्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा उपकॅप्टन होता, तो सध्या फिट आहे. त्यामुळं हार्दिक पांड्याला टी 20 मालिकेत कॅप्टनपद दिलं जाणार आहे.
4/5

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिका 27 जुलैपासून सुरु होणार आहे. 27 जुलै, 28 जुलै आणि 30 जुलै रोजी तीन मॅच होणार आहेत.
5/5

हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी कॅप्टन करण्यात येऊ शकतं. मात्र, हार्दिक पांड्या भारताच्या टी 20 संघाचा पूर्णवेळ कॅप्टन असेल की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे हार्दिकला कॅप्टन केल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे उपकॅप्टनपदाच्या शर्यतीत आहेत.
Published at : 16 Jul 2024 04:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
करमणूक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
