एक्स्प्लोर

बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका

बलुच लिबरेशन आर्मीने बोलानच्या मशकाफमध्ये गुडालार आणि पिरू कुंरी दरम्यान हल्ला केला. हा एक डोंगराळ भाग आहे, जिथे 17 बोगदे आहेत, त्यामुळे ट्रेन कमी वेगाने चालवावी लागते.

Baloch rebels hijack train in Pakistan : पाकिस्तानातील बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) मंगळवारी जाफर एक्स्प्रेसवर हल्ला करून अपहरण केले. तब्बल 24 तासांनंतर लष्कराच्या कारवाईत 16 बंडखोर मारले गेले आहेत. क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या या ट्रेनमध्ये जवळपास 500 लोक होते. या प्रवाशांमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि पोलिसांचा समावेश होता. बीएलएने यातील 214 प्रवाशांना ओलीस ठेवले, तर 30 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, सुरक्षा दलांनी 104 ओलिसांची सुटका केली आहे. यामध्ये 58 पुरुष, 31 महिला आणि 15 लहान मुलांचा समावेश आहे. उर्वरितांची सुटका करण्याची कारवाई सुरू आहे.

बीएलएने पकडलेल्या प्रवाशांचे युद्धकैदी असे वर्णन केले आहे आणि त्यांच्या बदल्यात पाकिस्तानमध्ये तुरुंगात असलेल्या बलुच कार्यकर्ते, राजकीय कैदी, बेपत्ता व्यक्ती, सैनिक आणि फुटीरतावादी नेत्यांची बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली आहे. यासाठी बीएलएने मंगळवारी रात्री 10 वाजता पाकिस्तान सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. हा निर्णय बदलणार नाही, असे बीएलएचे म्हणणे आहे.

बलुचिस्तानच्या बोलान जिल्ह्यात हल्ला 

जाफर एक्स्प्रेस सकाळी 9 वाजता क्वेट्टाहून पेशावरसाठी रवाना झाली. सिबी येथे येण्याची वेळ 1.30 होती. याआधीही दुपारी एकच्या सुमारास बलुचिस्तानच्या बोलान जिल्ह्यातील मशकाफ भागात हल्ला झाला होता. ट्रेन अजूनही पूर्णपणे बीएलए फायटरच्या ताब्यात आहे. गेल्या वर्षी, 25 आणि 26 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री, बीएलएने या ट्रेनच्या मार्गावरील कोलपूर ते माच दरम्यानचा पूल उडवला होता. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती. 11 ऑक्टोबर 2024 पासून रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली.

पाकिस्तानी मंत्री म्हणाले, हे भ्याड लढवय्ये आहेत

पाकिस्तानचे गृहराज्यमंत्री तलाल चौधरी यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी काही प्रवाशांना सोडले आहे. अनेकांना ट्रेनमधून उतरवून डोंगराळ भागात नेण्यात आले आहे. बीएलएचे लढवय्ये महिला आणि मुलांचा ढाल म्हणून वापर करत आहेत. जीवितहानी होण्याचा धोका असल्याने लष्कराचे जवान सावधगिरीने काम करत आहेत. ऑपरेशन अजूनही सुरू आहे. हे लढवय्ये भ्याड आहेत. ते सोपे लक्ष्य निवडतात आणि गुप्तपणे हल्ला करतात. निष्पाप प्रवाशांवर गोळीबार करणाऱ्या प्राण्यांशी आम्ही तडजोड करणार नाही, असे पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नक्वी यांनी सांगितले. पाकिस्तानी लष्कराने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

डोंगराळ भागाचा फायदा घेत बीएलएने हल्ला केला

बलुच लिबरेशन आर्मीने बोलानच्या मशकाफमध्ये गुडालार आणि पिरू कुंरी दरम्यान हल्ला केला. हा एक डोंगराळ भाग आहे, जिथे 17 बोगदे आहेत, त्यामुळे ट्रेन कमी वेगाने चालवावी लागते. याचा फायदा घेत बीएलएने ट्रेनवर हल्ला केला. सर्वप्रथम मश्काफमधील बोगदा क्रमांक 8 मध्ये बलुच आर्मीने रेल्वे ट्रॅक उडवून दिला. त्यामुळे जाफर एक्स्प्रेस रुळावरून घसरली. यानंतर बीएलएने गोळीबार सुरू केला. या गोळीबारात रेल्वे चालकही जखमी झाला आहे. या ट्रेनमध्ये सुरक्षा दल, पोलीस आणि आयएसआयचे एजंट प्रवास करत होते. सगळे पंजाबला जात होते. त्यांनी बीएलएच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले, परंतु बीएलएने ट्रेन ताब्यात घेतली. या काळात अनेक सुरक्षा जवान शहीद झाले. घटनेची माहिती मिळताच, पाकिस्तानी लष्कराने बीएलएवर जमिनीवर गोळीबार केला आणि हवेतून बॉम्बही सोडले, परंतु बीएलए विद्रोहींनी  कसा तरी लष्कराचे ग्राउंड ऑपरेशन थांबवले.

बीएलए म्हणाले, या हत्याकांडाला पाकिस्तानी सैन्य जबाबदार असेल

बीएलएने एका निवेदनात म्हटले आहे की, आमच्या सैनिकांनी मशकाफ, धादर आणि बोलानमध्ये या ऑपरेशनची योजना आखली होती. आम्ही रेल्वे ट्रॅक उडवला, त्यामुळे जाफर एक्सप्रेस थांबवावी लागली. यानंतर आमच्या सैनिकांनी ही ट्रेन ताब्यात घेतली आणि प्रवाशांना ओलीस ठेवले. ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) चे कर्तव्यावरील कर्मचारी आहेत, जे पंजाबला जात होते. आम्ही महिला, मुले आणि बलूच प्रवाशांची सुटका केली आहे आणि फक्त पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांना ओलीस ठेवले आहे. या ऑपरेशनचे नेतृत्व बीएलएचे फिदाईन युनिट आणि माजीद ब्रिगेड करत आहे, ज्याला फतेह स्क्वाड, एसटीओएस आणि जिराब इंटेलिजन्स विंगचा पाठिंबा आहे. आमच्या विरोधात कोणतीही लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सर्व ओलीस ठार करू. या हत्याकांडाची जबाबदारी पाकिस्तानी लष्कराची असेल.

दोन वर्षांपूर्वीही जाफर एक्स्प्रेसमध्ये स्फोट झाला होता

16 फेब्रुवारी 2023 रोजी जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट झाला होता, ज्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला होता. ट्रेन चिचवाटणी रेल्वे स्टेशन ओलांडत असताना हा स्फोट झाला. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्या वर्षी 14 नोव्हेंबर 2024 रोजी क्वेटा रेल्वे स्थानकावर झालेल्या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला होता. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यानंतरही या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) या दहशतवादी संघटनेने घेतली होती.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी म्हणजे काय?

बलुचिस्तानमधील अनेक लोकांचा असा विश्वास आहे की भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्यांना स्वतंत्र देश म्हणून जगायचे होते. पण त्यांच्या संमतीशिवाय त्यांचा पाकिस्तानात समावेश करण्यात आला. तसे झाले नाही, त्यामुळे बलुचिस्तानमध्ये लष्कर आणि जनता यांच्यातील संघर्ष आजही सुरू आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम

व्हिडीओ

BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष
Rane vs Rane : मालवणमध्ये 10 जागांवर शिवसेनेचा मोठा विजय Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
Embed widget